स्थानिक

नक्षत्र योगा ग्रुप च्या वतीने विक्रमी सूर्यनमस्कार

६ दिवसांमध्ये८० महिलांनी सहभाग घेऊन

नक्षत्र योगा ग्रुप च्या वतीने विक्रमी सूर्यनमस्कार

६ दिवसांमध्ये८० महिलांनी सहभाग घेऊन

बारामती वार्तापत्र 

मंगळवार दि ०४ फेब्रुवारी रोजी रथसप्तमीनिमित्त नक्षत्र योगा ग्रुपच्या महिलांनी १००८ सूर्यनमस्कार नऊवारी साडी नेसून पूर्ण केले. ६ दिवसांमध्ये८० महिलांनी सहभाग घेऊन १००८ सूर्यनमस्कार पूर्ण केले तसेच बारामती ,इंदापूर ,पाटस, पुणे या ठिकाणाहून पण ऑनलाईन सूर्यनमस्कार पूर्ण केले.

रथसप्तमीनिमित्त नक्षत्र योगा ग्रुपच्या संचालिका योगशिक्षिका सोनाली ठवरे यांच्या मार्गदर्शनाखाली हे शिबिर घेण्यात आले.

या शिबिरात हॅप्पी जर्नी टूर्सच्या ट्रेकर्स ग्रुपच्या प्रमुख योगिता काळोखे यांनी मार्गदर्शन केले.

सहभागी महिलांना प्रशस्तीपत्रक देऊन सन्मानित करण्यात आले. तसेच त्यांच्यामध्ये स्पर्धा घेऊन विजेत्या महिलांना प्रशस्तीपत्रक आणि ट्रॉफी देण्यात आले.

Back to top button