बारामती बाजार समिती मध्ये तेलबिया व कापसाचे लिलाव आठवड्यातुन एकदा
सोयाबीन खरेदी करणेची मुदतवाढ दि. ६ फेब्रुवारी २०२५ पर्यन्त देणेत आली
बारामती बाजार समिती मध्ये तेलबिया व कापसाचे लिलाव आठवड्यातुन एकदा
सोयाबीन खरेदी करणेची मुदतवाढ दि. ६ फेब्रुवारी २०२५ पर्यन्त देणेत आली
बारामती वार्तापत्र
बारामती कृषि उत्पन्न बाजार समितीचे मुख्य बाजार आवारात दर मंगळवार व शुक्रवार या दिवशी तेलबियांचे लिलाव उघड पद्धतीने होतात. तसेच कापुसाचे लिलाव दर बुधवार आणि शनिवार या दिवशी उघड पद्धतीनेच घेतले जातात.
बारामती मर्चन्ट असोसिएशन यांनी केलेल्या मागणीनुसार व सध्या हंगाम नसल्याने तेलबिया व कापुसाची आवक कमी असल्याने दि. ४/०२/२०२५ पासुन तेलबिया व कापसाचे लिलाव आठवठ्यातुन दर मंगळवार या दिवशी ठरलेल्या वेळेत घेतले जातील. त्यामुळे शेतक-यांनी आपला शेतमाल त्याच दिवशी बाजार आवारात विक्रीस आणावा आणि विक्रीस आणताना स्वच्छ व ग्रेडींग करून आणावा असे आवाहन समितीचे सभापती विश्वास आटोळे व उपसभापती रामचंद्र खलाटे यांनी केले आहे.
बाजार आवारात सोयाबीन, सुर्यफुल, भुईमूगशेंग या शेतमालाची आवक साधारण असुन चालु आठवड्यात सोयाबीनला किमान रू. ३८५० तर कमाल रू. ४०५१ प्रति क्विंटल दर मिळाला आणि सुर्यफुल कमाल दर रू. ६६५१ व भुईमूगशेंग चे कमाल रू. ४८०० प्रति क्विंटल दर निघाले तर कापसाला कमाल रू. ६५०० आणि सरासरी रू.६४०० असे दर निघाले.
सध्या सोयाबीन खरेदी केंद्र सुरू असुन ज्या शेतक-यांनी ऑनलाईन नोंदणी केली आहे अशा शेतक-यांचे सोयाबीन खरेदी करणेची मुदतवाढ दि. ६ फेब्रुवारी २०२५ पर्यन्त देणेत आली आहे. बारामती बाजार समितीमध्ये शासकीय सोयाबीन खरेदी केंद्र सुरू झाले पासुन आतापर्यन्त ३५० शेतक-यांची ३०२८ क्विंटल सोयाबीनची खरेदी झाली आहे अशी माहिती सचिव अरविंद जगताप यांनी दिली.