जनहित प्रतिष्ठानच्या विद्यालयात “अखंड सूर्यनमस्कार” घालत जागतिक सूर्यनमस्कार दिन साजरा..!
एक आगळा वेगळा विक्रम
जनहित प्रतिष्ठानच्या विद्यालयात “अखंड सूर्यनमस्कार” घालत जागतिक सूर्यनमस्कार दिन साजरा..!
एक आगळा वेगळा विक्रम
बारामती वार्तापत्र
बारामती येथील जनहित प्रतिष्ठानच्या प्राथमिक व माध्यमिक विद्यालयातील नर्सरी ते ९ वी पर्यंतच्या सर्व विद्यार्थ्यांनी दि.०४ फेब्रुवारी २०२५ रोजी जागतिक सूर्यनमस्कार दिना निमित्त सुमारे १,१२,९०० सूर्यनमस्कार घालून एक आगळा वेगळा विक्रम नोंदवला.
या दिवशी उपस्थित सर्व विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला. सहभागी विद्यार्थ्यांपैकी ६० विद्यार्थ्यांनी सूर्योदय (स. ७:१४) ते सूर्यास्त (सायं. ६:३१) प्रत्येकी १,३६२ सूर्यनमस्कार घातले याच बरोबर नर्सरी व बालभवन विभागाने सहभाग नोंदवून सुमारे ११०० सूर्यनमस्कार घातले तसेच प्राथमिक विभागातील विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदवून सुमारे ४,८०० सूर्यनमस्कार घातले. त्याच बरोबर शिक्षक, शिक्षकेत्तर कर्मचारी, संचालक, स्नातक विद्यार्थी व पालक या सर्वांनी सूर्यनमस्कार घालत जागतिक सूर्यनमस्कार दिनाचा आनंद घेतला तर संस्थेचे सचिव मा. श्री. सतीश गायकवाड (सर) यांनी २३५ सूर्यनमस्कार घातले.
जनहित प्रतिष्ठानच्या विद्यालयामध्ये पंचकोशाच्या विकसनासाठी विद्यार्थ्यांचा दररोज सकाळी सूर्यनमस्कार, योगा व उपासना यांचा सराव घेतला जातो. यामुळे जागतिक सूर्यनमस्कार दिना दिवशी विद्यार्थ्यांनी अनेक सूर्यनमस्कार सहज घातले.
समारोप कार्यक्रमास प्रमुख पाहुणे म्हणून मा.श्री.डॉ.संजय पुरंदरे हे उपस्थित होते त्यांनी दिवसभर म्हणजेच सकाळी सूर्योदय ते सूर्यास्त होईपर्यंत अखंडपणे सूर्यनमस्कार घालणाऱ्या विद्यार्थ्यांचे कौतुक केले व आहाराविषयी मार्गदर्शन केले. मा.श्री. दिपक पेशवे यांनी सर्व विद्यार्थ्यांचे कौतुक केले. सदर कार्यक्रमाचे नियोजन विद्यालयाचे प्रभारी आचार्य श्री.अजित रेवडे, क्रीडा शिक्षक श्री.सचिन नाळे व श्री.अजिंक्य साळी यांनी केले.
या सर्व सहभागी विद्यार्थ्यांचे कौतुक व अभिनंदन संस्थेचे अध्यक्ष मा. श्री. किशोर कानिटकर, कार्याध्यक्ष समन्वयक मा. श्री. किशोर शिवरकर, उपाध्यक्ष (प्राथमिक) मा.श्री. किरण शहा (वाडीकर), उपाध्यक्ष (गुरुकुल) मा.श्री. हृषीकेश घारे (सर), सचिव मा.श्री. सतीश गायकवाड (सर), खजिनदार मा. श्री. सतीश धोकटे व सर्व संचालक मंडळ तसेच आचार्य श्री. हनुमंत दुधाळ, मुख्याध्यापक श्री. अतुल कुटे, बालभवन प्रमुख श्री. निलेश भोंडवे, सर्व शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी व पालक वर्ग यांनी केले.