जीबीएस

काळजी घ्या!! बारामतीतील ६५ वर्षीय ज्येष्ठ रुग्णाला जीबी सिंड्रोम सदृश्य आजाराची लक्षणे

रुग्णांची पुणे जिल्ह्यातील या रुग्णांची संख्या आता २० वर पोहोचली आहे.

काळजी घ्या!! बारामतीतील ६५ वर्षीय ज्येष्ठ रुग्णाला जीबी सिंड्रोम सदृश्य आजाराची लक्षणे

रुग्णांची पुणे जिल्ह्यातील या रुग्णांची संख्या आता २० वर पोहोचली आहे.

बारामती वार्तापत्र 

बारामती शहरात तांदुळवाडी परीसरातील एका ६५ वर्षीय ज्येष्ठ रुग्णाला जीबी सिंड्रोम सदृश्य आजाराची लक्षणे आढळली आहेत.या रुग्णावर बारामती शहरातील एका खासगी रुग्णालयात उपचार सुरु आहेत.त्यांची प्रकृती स`थिर असल्याची माहिती आरोग्य प्रशासनाच्या वतीने देण्यात आली.

बारामतीकर ज्येष्ठ नागरीक पुणे शहरात एका सत्संग कार्यक्रमासाठी गेले होते.बारामतीत परतल्यावर त्यांना एका रुग्णाला जीबी सिंड्रोम सदृश्य आजाराची लक्षणे आढळल्याचे दिसुन आले. त्यानंतर त्यांच्या या आजाराच्या तपासणीसाठी आवश्यक नमुने पुणे येथील राष्ट्रीय विषाणु प्रयाेगशाळेत पाठविण्यात आले आहेत.

बुधवारी(दि ५)सायंकाळपर्यंत याबाबतचा अहवाल प्राप्त झालेला नव्हता.दरम्यान, जीबी सिंड्रोम चे रुग्णांची पुणे जिल्ह्यातील या रुग्णांची संख्या आता २० वर पोहोचली आहे. तसेच बारामती येथील २६ वर्षीय युवती पुणे शहरात शिक्षणास वास्तव्यास आहे.ती युवती काही दिवसांपुर्वी एक दोन दिवसांसाठी तिच्या बारामती येथील घरी आली होती.यावेळी तिला अन्न गिळण्यास त्रास झाला.त्यानंतरतिला बारामतीत प्राथमिक उपचार घेतल्यानंतर थेट पुण्यात खासगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले.तिच्यावर पुण्यातील एका खासगी रुग्णालयात अतिदक्षता विभागात उपचार सुरु आहेत.या युवतीची प्रकृती स`थिर असल्याचे आरोग्य विभागाच्या विस्तार अधिकारी डाॅ.सुप्रिया सावरकर यांनी सांगितले.

या युवतीला जीबी सिंड्रोम आजाराची लागण झाल्यचे निष्पन्न झाले आहे.तसेच हि युवती पुणे शहरात वास्तव्यास आहेत.बारामतीत आल्यानंतर तिला हा त्रास जाणवला.त्यामुळे पुणे शहरातच तिला या आजाराची लागण झाल्याचा अंदाज आहे.बारामतीत एकही रुग्ण नाही.बारामतीत काेणालाही या आजाराची लागण झालेली नाही.युवती आणि जीबी सिंड्रोम सदृश्य आजाराची लक्षणे आढळलेले ज्येष्ठ नागरीक या दोघांची पुणे प्रवासाची ‘हिस्ट्री’ आहे.त्यामुळे त्या युवतीची पुणे शहरात नोंद करण्यात आलेली आहे.तर ज्येष्ठ नागरीकांचा अहवाल अद्याप आलेला नाही.बारामती नगरपरीषदेच्या पिण्याच्या पाण्यचा अहवाल उत्तम आहे.शिवाय काही खासगी विंधनविहींरींच्या पाण्याचा अहवाल चांगला असल्याचे डाॅ.सावरकर यांनी सांगितले.

बारामती येथील सिल्व्हर ज्युबिली रुग्णालयाचे वैद्यकीय अधिक्षक डाॅ.महेश जगताप यांनी सांगितले,नागरीकांनी स्वच्छ पाणी प्यावे.ताप,अशक्तपणा सारखी लक्षणे आढळल्या जवळच्या रुग्णालयात संपर्क साधावा.बारामतीत आवश्यक यंत्रणा सज्ज आहे.नागरीकांनी घाबरुन जावू नये,असे आवाहन डाॅ.जगताप यांनी केले आहे.बारामती तालुका अधिकारी डाॅ.मनोज खाेमणे यांनी सांगितले की,आरोग्य विभागाचा नियमित सर्व्हे सुरुच असतो.त्या प्रमाणे या आजाराचा गावोगावी सर्व्हे करण्यात आला.यामध्ये एक लाख नागरीकांमध्ये एक दोन रुग्ण आढळतात.

हे ‘नाॅर्मल’ आहे.मात्र, एखाद्या ठराविक भागात अधिक रुग्ण आढळल्यास त्या आजाराची साथ पसरल्याचे मानले जाते.बारामतीत अशी कोेणतीही परीस`थिती नाही.त्यामुळे नागरीकांनी घाबरुन जावु नये.उघड्यावरील अन्न खावू नये.सर्दी खोकला,जुलाब,उलट्या झाल्यास डाॅक्टरांचा सल्ला घ्यावा.घरी उपचार करु नये,असे आवाहन डाॅ.खाेमणे यांनी केले आहे.

काय काळजी घ्यावी?

    • पाणी उकळून व गाळून प्यावे.
    • उघड्यावरील व शिळे अन्न खाणे टाळावे.
    • अचानकपणे हातापायाच्या स्नायूंमध्ये अशक्तपणा जाणवल्यास डॉक्टरांचा सल्ला घ्यावा किंवा जवळील शासकीय रुग्णालयात जावे.

कॅम्पिलोबॅक्टरमुळे जीबीएस कसा होतो?

    • दूषित पाणी किंवा अन्न खाल्यावर कॅम्पिलोबॅक्टर जेजुनीचा संसर्ग होऊ शकतो.
    • संसर्गामुळे अतिसार आणि ओटीपोटात वेदना होऊ शकतात.
    • काही व्यक्तींमध्ये प्रतिकारशक्ती मज्जातंतूंना लक्ष्य करते. ज्यामुळे १ ते ३ आठवड्यांच्या आत जीबीएसचे निदान होते.
    • याशिवाय, डेंग्यू, चिकनगुनियाचे विषाणू किंवा इतर बॅक्टेरियाच्या संक्रमणामुळे मज्जातंतूंविरुद्ध रोगप्रतिकारक शक्ती हल्ला करते.

कॅम्पिलोबॅक्टर संसर्गाची लक्षणे

    • अतिसार
    • पोटदुखी
    • ताप
  • मळमळ किंवा उलट्या

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!