विद्या प्रतिष्ठान महाविद्यालयात आयटी उद्योग आणि प्रकल्प विकासासाठी यशस्वी करिअर मार्गदर्शन व्याख्यान संपन्न
185 विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदवला.

विद्या प्रतिष्ठान महाविद्यालयात आयटी उद्योग आणि प्रकल्प विकासासाठी यशस्वी करिअर मार्गदर्शन व्याख्यान संपन्न
185 विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदवला.
बारामती वार्तापत्र
विद्या प्रतिष्ठानचे कला, विज्ञान आणि वाणिज्य महाविद्यालयातील बी.बी.ए. (सी ए ) विभाग अंतर्गत “ब्रिजिंग द गॅप: आयटी उद्योग आणि प्रकल्प विकासासाठी यशस्वी करिअर मार्गदर्शन” या विषयावर विशेष व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले.
या कार्यक्रमासाठी डॉ. राजकुमार मोडके, वरिष्ठ उपाध्यक्ष, बँक ऑफ न्यूयॉर्क मेलॉन, अमेरिका हे प्रमुख वक्ते म्हणून उपस्थित होते.
व्याखानाचे समन्वयक अनिल काळोखे यांनी प्रमुख पाहुण्यांचा परिचय करून दिला.
सदर व्याख्यानासाठी एस वाय बी बी ए सी ए व टी वाय बी बी ए सी ए या वर्गातील 185 विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदवला.कार्यक्रमाची प्रस्तावना करताना विभागप्रमुख महेश पवार यांनी सांगितले की, विद्यार्थ्यांनी तंत्रज्ञानाच्या वेगवान प्रगतीसोबत स्वतःला अद्ययावत ठेवून उद्योगातील आवश्यक कौशल्ये आत्मसात करावी.
आज आयटी क्षेत्रात मोठ्या प्रमाणावर संधी उपलब्ध असून त्या साध्य करण्यासाठी विद्यार्थ्यांनी आपली कौशल्ये विकसित करावी असे आवाहन उपप्राचार्य डॉ. शामराव घाडगे यांनी केले.
प्राचार्य डॉ. भरत शिंदे यांनी आपल्या अध्यक्षीय भाषणात सांगितले की, आजच्या तंत्रज्ञान युगात विद्यार्थ्यांनी केवळ शैक्षणिक शिक्षणावर भर न देता व्यावहारिक ज्ञान, समस्या सोडवण्याची क्षमता आणि सतत नवनवीन तंत्रज्ञान आत्मसात करण्याची जिज्ञासा ठेवली पाहिजे. त्यांनी विद्यार्थ्यांना संशोधन व नवकल्पना यावर भर देण्याचे आवाहन केले.
प्रमुख वक्ते डॉ. राजकुमार मोडके यांनी विद्यार्थ्यांना आयटी क्षेत्रातील संधी, आवश्यक कौशल्ये आणि उद्योगातील बदल याविषयी सखोल मार्गदर्शन केले. त्यांनी प्रकल्प व्यवस्थापन, तंत्रज्ञानातील नवकल्पना, सॉफ्टवेअर डेव्हलपमेंट प्रक्रिया आणि उद्योगातील व्यावसायिक अपेक्षांवर विशेष भर दिला. त्यांनी विद्यार्थ्यांना योग्य कौशल्यविकास, समस्या सोडवण्याच्या पद्धती, नवीन तंत्रज्ञान आत्मसात करणे आणि व्यावसायिक नेटवर्किंगचे महत्त्व याविषयी मार्गदर्शन केले.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन पूनम गुंजवटे यांनी केले. कार्यक्रमाचे आभारप्रदर्शन विशाल शिंदे यांनी केले. सदर व्याख्यान यशस्वी पार पडण्यासाठी विभागातील अक्षय शिंदे, कांचन खिरे, अक्षय भोसले, वैशाली पेंढारकर,शुभांगी निकम,सतीश चौधर यांची मदत झाली.