देशातील बांधकाम व्यावसायिकांची अग्रगण्य संस्था असलेल्या क्रेडाईच्या अध्यक्षपदी प्रफुल्ल तावरे यांची,तर खजिनदारपदी सुरेंद्र भोईटे यांची निवड
६६ शहरातील विविध संघटना

देशातील बांधकाम व्यावसायिकांची अग्रगण्य संस्था असलेल्या क्रेडाईच्या अध्यक्षपदी प्रफुल्ल तावरे यांची,तर खजिनदारपदी सुरेंद्र भोईटे यांची निवड
६६ शहरातील विविध संघटना
बारामती वार्तापत्र
देशातील बांधकाम व्यावसायिकांची अग्रगण्य संस्था असलेल्या क्रेडाईच्या महाराष्ट्र राज्याच्या अध्यक्षपदी बारामती येथील मुक्ती ग्रूपचे प्रमुख प्रफुल्ल तावरे यांची, तर खजिनदारपदी माधुमालती ग्रूपचे सुरेंद्र भोईटे यांची बिनविरोध निवड करण्यात आली आहे. क्रेडाईसारख्या महत्वाच्या संस्थेत प्रमुख पदांवर प्रफुल्ल तावरे आणि सुरेंद्र भोईटे यांची निवड झाल्यामुळे बारामतीच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवला गेला आहे.
क्रेडाई महाराष्ट्र ही महाराष्ट्रातील बांधकाम व्यावसायिकांची शिखर संस्था आहे. राज्यातील ६६ शहरातील विविध संघटना या संस्थेची संलग्न आहेत. राज्यातील ग्राहक आणि बांधकाम व्यावसायिकांच्या हितासाठी ही संस्था कार्यरत असून शासनाच्या माध्यमातून राबवल्या जाणाऱ्या धोरणात्मक निर्णयांमध्ये या संस्थेचे महत्वपूर्ण योगदान आहे. संस्थेच्या कार्यकारिणीची बैठक नुकतीच पुण्यात पार पडली.
या बैठकीत २०२५ ते २०२७ या कालावधीसाठी अध्यक्षपदी प्रफुल्ल तावरे आणि खजिनदारपदी सुरेंद्र भोईटे यांची निवड करण्यात आली. या पदांच्या माध्यमातून बांधकाम व्यावसायिकांचं हित जोपासतानाच ग्राहकांच्या गरजेनुसार विविध उपक्रम हाती घेण्यासाठी कटिबद्ध राहू अशी ग्वाही प्रफुल्ल तावरे आणि सुरेंद्र भोईटे यांनी निवडीनंतर सांगितले. दरम्यान, बारामतीसारख्या तालुका स्तरावर प्रथमच क्रेडाईसारख्या अग्रगण्य संस्थेचे अध्यक्षपद मिळाले आहे.