इंदापूरात पाच दिवस रंगणार शरद कृषी महोत्सव
कृषी प्रदर्शन व शेतकरी मार्गदर्शन मेळाव्याचे येत्या गुरुवारपासून आयोजन.

इंदापूरात पाच दिवस रंगणार शरद कृषी महोत्सव
कृषी प्रदर्शन व शेतकरी मार्गदर्शन मेळाव्याचे येत्या गुरुवारपासून आयोजन..
इंदापूर प्रतिनिधी –
राष्ट्रवादी काँग्रेस (SP) पक्षाचे अध्यक्ष शरदचंद्र पवार यांच्या वाढदिवसानिमित्त इंदापूरात गुरुवार (दि.13) फेब्रुवारी ते सोमवार (दि.17) दरम्यान पाच दिवसीय शरद कृषी महोत्सवाचे आयोजन केले आहे. प्रदर्शनात शेतकऱ्यांसाठी शेतीतील ‘ए आय’ या आधुनिक तंत्रज्ञानाबाबत चचार्सत्र आयोजित केल्याची माहिती पक्षाचे कार्याध्यक्ष महारुद्र पाटील यांनी दिली.
इंदापूरातील प्रशासकीय भवन शेजारी असलेल्या भव्य प्रांगणात आयोजित या प्रदर्शनाच्या स्टॉल उभारणी कामाचा प्रारंभ व प्रसिद्धी पत्रक अनावरण प्रसंगी आयोजित पत्रकार परिषदेत महारुद्र पाटील बोलत होते.यावेळी पक्षाचे तालुकाध्यक्ष ॲड. तेजसिंह पाटील, किसनराव जावळे, छगन तांबिले,सागर मिसाळ, अॅड. इनायत काझी, अमोल मुळे, संजय शिंदे, देविदास भोंग, गणेश देवकर, श्रीकांत मखरे, विकास खिलारे, दत्ता बाबर उपस्थित होते.
यावेळी महारुद्र पाटील म्हणाले, इंदापूर तालुक्यातील शेतकऱ्यांना उत्पादन व उत्पन्न वाढीसाठी शरद कृषी महोत्सव मोठे वरदान ठरणार आहे. महोत्सवाचे उद्घाटन गुरुवारी (दि.13) कर्जत जामखेडचे आमदार रोहित पवार यांच्या हस्ते होणार आहे. शुक्रवारी (दि.14) विद्या प्रतिष्ठानचे खजिनदार युगेंद्र पवार यांच्या उपस्थित सांस्कृतिक कार्यक्रम, शनिवारी (दि.15) कृषी तंत्रज्ञानावर आधारित चर्चासत्रास राज्याचे माजी मंत्री व सहकारी साखर संघाचे अध्यक्ष हर्षवर्धन पाटील व बारामती अॅग्रोचे अध्यक्ष राजेंद्र पवार यांच्या उपस्थितीत होणार आहे. तर रविवारी (दि.16) रोजी बारामती लोकसभा मतदारसंघाच्या खासदार सुप्रिया सुळे व शिरूर लोकसभा मतदारसंघाचे खासदार अमोल कोल्हे यांच्या उपस्थितीत महिला व मुलींसाठी खेळ पैठणीचा, शरदचंद्रजी पवार मंच आयोजित चित्रकला व निबंध स्पर्धा पारितोषिक वितरण समारंभ व सोमवार (दि.17) रोजी सांस्कृतिक कार्यक्रम व प्रदर्शन समारोप समारंभ होणार आहे.
“ए आय”आधुनिक तंत्रज्ञानाबाबत चर्चासत्रे
शेतकऱ्यांसाठी फायदेशीर असलेल्या आधुनिक तंत्रज्ञानाबाबत शनिवार (दि.15) रोजी चर्चासत्राचे आयोजन केले असून, यामध्ये मनोज पाटील यांचे केळी लागवड व नियोजन या विषयावर, एआय तंत्रज्ञानावर आधारित ऊस शेती या विषयावर बारामती कृषी विज्ञान केंद्र यांचे तर गाईंचा भाकडकाळ कमी करण्यासाठी सुधारित तंत्रज्ञान या विषयावर रामदास ननवरे यांचे चर्चासत्र आयोजित केले आहे.
प्रदर्शनात २५० हून अधिक स्टॉलचा समावेश
उपयुक्त शेती अवजारे, बी बियाणे, कीटकनाशके
हरितगृह व इतर साहित्य, कृषी जैविक तंत्रज्ञान, मासेमारी
डेअरी तंत्रज्ञान, कुक्कुटपालन तंत्रज्ञान, शेतमाल प्रक्रिया उद्योग
अपारंपरिक ऊर्जा, कृषी बाजार, ठिबक सिंचन
शेळी मेंढी पालन माहिती, सौर ऊर्जा माहिती
ग्रीन हाऊस, पॉली हाऊस, खाऊ गल्ली