टेक्निकल च्या विद्यार्थांची वस्तुसंग्रहालय व नक्षत्र उद्यानास क्षेत्र भेट
इ 5 वी ते 7 वी या वर्गांची क्षेत्रभेट आयोजित केली होती.

टेक्निकल च्या विद्यार्थांची वस्तुसंग्रहालय व नक्षत्र उद्यानास क्षेत्र भेट
इ 5 वी ते 7 वी या वर्गांची क्षेत्रभेट आयोजित केली होती.
बारामती वार्तापत्र
बारामती येथील रयत शिक्षण संस्थेच्या राधेश्याम एन आगरवाल टेक्निकल विद्यालयातील विद्यार्थांनी क्षेत्र भेट या उपक्रमांतर्गत नक्षत्र उद्यान व वस्तुसंग्रहालय यांना भेट दिली.
रयत शिक्षण संस्थेच्या कर्मवीर विद्याप्रबोधिनी अंतर्गत चालवल्या जाणाऱ्या रयत अनिवासी गुरुकुल प्रकल्पांतर्गत इ 5 वी ते 7 वी या वर्गांची क्षेत्रभेट आयोजित केली होती.
सर्वप्रथम नक्षत्र उद्यानातील विविध प्रकारची झाडे व त्याचे उपयोग यांची माहिती विद्यार्थांनी घेतली.तसेच तेथे असणाऱ्या पाणी शुद्धीकरणाच्या प्रकल्पास भेट दिली.तेथे ड्रेनेज चे पाण्यावर प्रक्रिया करून ते पाणी सर्व झाडाना दिले जाते.
याची माहिती उपशिक्षक श्री जाधव विकास यांनी दिली.तसेच त्याच परिसरातील श्री शरदचंद्र पवार साहेब यांच्या विविध वस्तूंचे संग्रह असणाऱ्या वस्तुसंग्रहालय याला सर्व विद्यार्थांनी भेट दिली.
श्री शरदचंद्रजी पवारसाहेब हे किती उत्तुंग व्यक्तिमत्त्व आहेत याची प्रचिती या वस्तुसंग्रहालयास भेट दिल्यानंतर विद्यार्थ्यांना आली.या भेटीचे आयोजन क्षेत्र भेट प्रमुख श्री महादेव शेलार यांनी केले.यावेळी श्री विकास जाधव,श्री भाऊसाहेब भालके,संतोष खोमणे,श्री दीपक मुळीक,सौ.कल्पना घुले,सौ.जगताप उपस्थित होत्या.
यासाठी गुरुकुल प्रमुख श्री अरविंद मोहिते,श्री निलेश गायकवाड व विद्यालयाचे प्राचार्य श्री कल्याण देवडे यांनी मार्गदर्शन केले.