ग्लोबल बुक ऑफ एक्सलेन्स, इंग्लंड यांच्या कडून कलाकारांचा सन्मान
चांडाळ चौकडीच्या करामती या मराठी वेबसिरीजने ९० कोटी व्यूज चा टप्पा पार करून रचला विश्वविक्रम

ग्लोबल बुक ऑफ एक्सलेन्स, इंग्लंड यांच्या कडून कलाकारांचा सन्मान
चांडाळ चौकडीच्या करामती या मराठी वेबसिरीजने ९० कोटी व्यूज चा टप्पा पार करून रचला विश्वविक्रम
बारामती वार्तापत्र
कांबळेश्वर येथील गावरान फिल्म्स -प्रोडक्शन प्रस्तुत चांडाळ चौकडीच्या करामती या मराठी वेबसिरीजने ५ जानेवारी २०२० पासून सुरू केलेल्या प्रवासाला नुकतीच ५ वर्षे पूर्ण झाली.
भरत शिंदे (बाळासाहेब), रामदास जगताप (रामभाऊ), सुभाष मदने (सुभाषराव) या त्रिमूर्तीने सुरू केलेला कलेचा प्रवास जागतिक पातळीवर जाऊन पोहोचला. या दरम्यान अनेक अडचणींचा सामना करत या वेबसिरीजने फार मोठे यश संपादन केले.
या वेबसिरीजने ५ वर्षाच्या कालावधीत ९० कोटी व्यूज तसेच २१ लाख ३५ हजार त्यामुळे ही मराठी वेबसिरीज संपूर्ण महाराष्ट्रात प्रथम क्रमांकाची जागतिक दर्जावर दखल घेणारी ठरली आहे. त्यामुळे ग्लोबल बुक ऑफ एक्सलेन्स, इंग्लंड यांचेकडून या वेबसिरीजचा गौरव करण्यात आला.
गावरान फिल्म्स प्रोडक्शन प्रस्तुत चांडाळ चौकडीच्या करामती या मराठी वेबसिरीजने ५ जानेवारी २०२० पासून सुरू केलेल्या प्रवासाला नुकतीच ५ वर्षे पूर्ण झाली.
यासाठी ग्लोबल बुक ऑफ एक्सलेन्स, इंग्लंडचे उपाध्यक्ष डॉ. दीपक हरके यांनी बारामती तालुक्यातील कांबळेश्वर येथे भरत शिंदे (बाळासाहेब), रामदास जगताप (रामभाऊ), सुभाष मदने (सुभाषराव) यांना विश्वविक्रमाचे सभासदांचा टप्पा पूर्ण केला आहे. प्रमाणपत्र प्रदान केले.
बारामती तालुक्यातील कांबळेश्वर येथे भरत शिंदे (बाळासाहेब), रामदास जगताप (रामभाऊ), सुभाष मदने (सुभाषराव) यांना विश्वविक्रमाचे प्रमाणपत्र प्रदान केले. यावेळी सूत्रसंचालक
अनिल सावळेपाटील, माजी पंचायत समिती सभापती बारामती करण खलाटे, रामदास जगताप, सुभाष मदने व भरत शिंदे व इतर सहकारी कलाकार उपस्तीत होते.
चौकट:
मराठी भाषा मध्ये वेब सिरीजने विक्रम केल्याबद्दल महाराष्ट्र मंडळ इंग्लड यांच्या वतीने लंडन येथे सन्मान सोहळा व काही निवडक भागाचा स्टेज शो चे आयोजन करण्याचे नियोजन आहे.
डॉ दीपक हरके उपाध्यक्ष :ग्लोबल बुक ऑफ एक्सलेन्स, इंग्लंड
फोटो ओळ:
चांडाळ चौकटीच्या करामतीच्या कलाकारांचा सन्मान करताना डॉक्टर दीपक हरके व इतर