स्थानिक

पुणे विभागस्तरीय सांस्कृतिक व क्रीडा स्पर्धा बारामती येथे संपन्न

बारामती नगरपरिषदेच्यावतीने स्पर्धेचे उत्कृष्ट नियोजन

पुणे विभागस्तरीय सांस्कृतिक व क्रीडा स्पर्धा बारामती येथे संपन्न

बारामती नगरपरिषदेच्यावतीने स्पर्धेचे उत्कृष्ट नियोजन

बारामती वार्तापत्र

आयुक्त तथा संचालक, नगरपरिषद प्रशासन संचालनालय यांच्या निर्देशाप्रमाणे पुणे विभागस्तरीय सांस्कृतिक व क्रीडा स्पर्धा ११ व १२ फेब्रुवारी या कालावधीत या बारामती येथे संपन्न झाल्या. नगरपरिषद प्रशासन संचालनालयाचे आयुक्त तथा संचालक मनोज रानडे यांच्या हस्ते विजेत्या खेळाडू व संघाला बक्षीस वितरण करण्यात आले.

शहरात जिल्हा क्रीडा संकुल, तुळजाराम चतुरचंद महाविद्यालयाचे मैदान, डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्टेडियम आणि कवीवर्य मोरोपंत नाट्यगृह येथे विविध स्पर्धांचे आयोजन करण्यात आले. पुणे विभागाच्या सहआयुक्त  पुनम मेहता, उपायुक्त  दत्तात्रय लांघी यांच्या हस्ते पुणे विभागस्तरीय सांस्कृतिक व क्रीडा स्पर्धेचे ११ फेब्रुवारी रोजी डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्टेडियम येथे उद्धाटन करण्यात आले. यावेळी या क्रीडा आणि सांस्कृतिक स्पर्धांमध्ये सह उपायुक्त अभिजित बापट (सातारा), विना पवार (सोलापूर), नागेंद्र मुतकेकर (कोल्हापूर), चंद्रकांत खोसे (सांगली), आणि  व्यंकटेश दूर्वास (पुणे) तसेच मुख्याधिकारी आदी उपस्थित होते.

पुणे विभागाच्यावतीने पुणे विभागस्तरीय सांस्कृतिक व क्रीडा स्पर्धेचे यजमानपद जिल्हा सहआयुक्त व्यंकटेश दूर्वास यांनी स्वीकारले. बारामती नगरपरिषदेचे मुख्याधिकारी महेश रोकडे आणि त्यांच्या पथकाने स्पर्धेचे उत्कृष्ट नियोजन करुन या स्पर्धा अतिशय खेळीमेळीच्या वातावरणात यशस्वीपणे पार पाडल्या. पुणे, सातारा, सांगली, कोल्हापूर आणि सोलापूर जिल्ह्यांमधील नगरपरिषदेतील 700 अधिकारी व कर्मचाऱ्यांनी  सहभाग नोंदवला.

स्पर्धेतील खेळ आणि सांस्कृतिक कार्यक्रम

या विभागस्तरीय स्पर्धांमध्ये एकूण १७ प्रकारच्या क्रीडा आणि सांस्कृतिक स्पर्धा पार पडल्या.

वैयक्तिक क्रीडा स्पर्धा:  बॅडमिंटन, टेबल टेनिस, बुद्धिबळ, कॅरम, १००, २०० व ४०० मीटर धावणे, तीन कि. मी.  चालणे, गोळाफेक, थाळीफेक, भालाफेक, उंच उडी, फ्रीस्टाइल ५० मीटर पोहणे.

सांघिक खेळ:  क्रिकेट, रस्सीखेच, रिले (१००*४, ४००*४), व्हॉलीबॉल, कबड्डी.

सांस्कृतिक स्पर्धा: वैयक्तिक गायन, समूह गायन, वैयक्तिक नृत्य, समूह नृत्य, वेशभूषा, नाटिका, प्रहसन, रांगोळी, कविता वाचन, चारोळी आणि पाककला स्पर्धा.

बारामती नगरपरिषदेप्रमाणे शाश्वत विकासाची उद्दिष्टे साध्य करण्याकरीता प्रयत्न करावे-नगरपरिषद प्रशासन संचालनालयाचे आयुक्त तथा संचालक मनोज रानडे

या स्पर्धेच्या माध्यमातून कर्मचाऱ्यांना आपल्या अंगातील सुप्त गुण  व कलांना वाव मिळाला असून त्यासादर करण्याची संधी मिळाली आहे. स्पर्धेच्या माध्यमातून निर्माण झालेले सकारात्मक वातावरणाचा उपयोग नागरिकांचे दैनंदिन जीवनमान सुकर करण्याकरीता केला पाहिजे. अधिकारी व कर्मचाऱ्यांनी शारीरिक, मानसिक व आरोग्य स्वास्थ तंदुरुस्त ठेवण्यासाठी प्रत्येकानी किमान एकतरी खेळ नियमितपणे खेळला पाहिजे तसेच सांस्कृतिक क्षेत्रातही रुची दर्शवली पाहिजे.

बारामती नगरपरिषदेने शहरात केलेल्या विविध कामाच्या माध्यमातून  शाश्वत विकासाची उद्दिष्टे साध्य करण्यावर भर दिला आहे. याप्रमाणे नगरपरिषदेने उपाययोजना करण्याचा प्रयत्न करावा. दैनंदिन प्रशासकीय कामकाज करतांना नवनवीन तंत्रज्ञानाचा वापर करुन लोककल्याणकारी उपक्रम रावावेत. नगरपरिषदेने वसुलीचे उद्दिष्ट साध्य करण्याकरीता प्रभावी उपाययोजना  कराव्यात, असेही श्री. रानडे म्हणाले

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!