“भरधाव डंपरच्या धडकेने बारामती तालुक्यातील रस्त्याच्या कडेने घरी चाललेल्या तरुणावर काळाचा घाला; दुर्दैवी अपघाताने हळहळ”
अपघाताचा तपास हवालदार प्रविण वायसे करीत आहेत.

“भरधाव डंपरच्या धडकेने बारामती तालुक्यातील रस्त्याच्या कडेने घरी चाललेल्या तरुणावर काळाचा घाला; दुर्दैवी अपघाताने हळहळ”
अपघाताचा तपास हवालदार प्रविण वायसे करीत आहेत.
बारामती वार्तापत्र
भरधाव डंपरने धडक दिल्याने रस्त्याने घरी चाललेल्या इसमाचा जागीच मृत्यू झाला असून सदर घटना जळगाव क.प.(ता.बारामती) येथे दि.१३ रोजी दुपारी पावणे चार वाजता घडली.
रामदास जयवंत ताम्हाणे ( वय ६५, रा.जळगाव क.प. ता.बारामती) असे मृत्यू झालेल्या इसमाचे नाव आहे.याबाबत मृत्यू पडलेल्या इसमाच्या पुतणे उमेश लक्ष्मण ताम्हाणे (रा.जळगाव क.प. ता.बारामती ) यांनी माळेगाव पोलिस ठाण्यात दिलेल्या फिर्यादीवरून आरोपी डंपर चालक हिरामण श्रावण बाबर (रा.आदर्श नगर , बारामती) यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
फिर्यादी हे घरासमोरील मोकळ्या जागेत बसले असताना त्यांचे चुलते रामदास ताम्हाणे हे बारामती – मोरगाव रोडने डाव्या बाजुने पायी चालत येत असताना पाहिले.याचवेळी मोरगाव बाजु कडून एक पिवळ्या रंगाचा डंपर क्र.(एम.एच.४२ टी ०३२९) भरधाव वेगाने बारामतीकडे जाताना स्पीड ब्रेकर जवळ चुलत्यांना ठोस देऊन तसाच पुढे गेला.यावेळी फिर्यादीचे चुलते हे गंभीर जखमी होऊन जागीच मृत्यू झाल्याचे दिसून आले.सदर अपघाताचा तपास हवालदार प्रविण वायसे करीत आहेत.
चौकट –
अपघात करुन भरधाव वेगाने डंपर बारामतीकडे निघून गेला.यावेळी जळगावच्या ग्रामस्थांनी त्याचा पाठलाग करुन क-हावागज ता.बारामती येथे पकडला.यावेळी पळून जाण्याच्या नादात डंपर चालकाने आणखी अपघात केला असता असे एका ग्रामस्थांने सांगितले.बारामती – मोरगाव या रस्त्याचे काम झाल्याने वहाने वेगाने ये-जा करतात.अशातच ४ सप्टेंबर २०२३ रोजी जळगाव क.प.येथे भरधाव कारने धडक दिल्याने दोन शाळकरी मुलांचा मृत्यू झाला होता.यावेळी ग्रामस्थांनी केलेल्या आंदोलनामुळे जळगाव क.प.येथे ५ ठिकाणी स्पीड ब्रेकर उभारले आहेत.