बारामती येथे महिला बचत गटांनी उत्पादित केलेल्या मालाला बाजारपेठ मिळवून देण्यासाठी चर्चासत्र
उत्पादन केलेला वस्तुंना कसे मार्केट उपलब्ध होईल या वर चर्चा

बारामती येथे महिला बचत गटांनी उत्पादित केलेल्या मालाला बाजारपेठ मिळवून देण्यासाठी चर्चासत्र
उत्पादन केलेला वस्तुंना कसे मार्केट उपलब्ध होईल या वर चर्चा
बारामती वार्तापत्र
बारामती, दौंड, इंदापूर, पुरंदर येथील बचत गटातील महिलांनी उत्पादित केलेल्या वस्तूंना बाजारपेठ उपलब्ध करून देण्यासाठी बारामती येथील पंचायत समितीच्या सभागृहात दि.२१ फेब्रुवारी रोजी कार्यक्रम आयोजित केला होता.
या प्रसंगी बारामती पंचायत समितीचे गटविकास अधिकारी अनिल बागल तसेच दि.मर्चंट असोसिएशन अध्यक्ष संभाजीराव किर्वे, उपाध्यक्ष निलेश भामे, सेक्रेटरी निलेश दोशी, संचालक दीपक मचाले बारामती व्यापारी महासंघाचे अध्यक्ष सुशीलकुमार शेठ सोमानी, कार्याध्यक्ष जगदिश पंजाबी, राहुल शेठ वाघोलीकर, सचिन शेठ बुधकर, इमान पठान तसेच यावेळी जिल्हा व्यवस्थापक मार्केटिंगचे विकास लुबाळ, कुणाल पोळ उपस्थित होते.
उपस्थित राहून बचत गटातील महिलांना मार्गदर्शन केले. त्यांनी उत्पादन केलेला वस्तुंना कसे मार्केट उपलब्ध होईल या वर चर्चा करण्यात आली.
यावेळी बारामती पंचायत समितीचे गटविकास अधिकारी अनिल बागल यांनी प्रास्ताविक केले. तसेच जिल्हा अभियान व्यवस्थापक विश्वजीत आजबे व जिल्हा व्यवस्थापक उपजिवीका यांनी वरील मिटिंग चा उद्देश समजून सांगितला. यावेळी विकास लुबाळ जिल्हा व्यवस्थापक मार्केटिंग कुणाल पोळ उपस्थित होते.
इंदापुर पुरंदर दौंड बारामती तालुक्यातील उत्पादीत उत्पादन केलेल्या स्वयंम सहायत्ता समुहातील महिला व तालुका अभियान कक्ष पंचायत बारामती येथील सर्व कर्मचारी व अधिकारी वर्ग उपस्थित होते. कार्यक्रमाचे आभार विशाल इंगुले, व पंचायत समितीचे तालुका व्यवस्थापक संदिप पालवे यांनी मानले.