
बारामतीत रयत बँकेतर्फे गुणवंतांचा सन्मान सोहळा संपन्न
84 व्या वर्धापन दिनानिमित्त
बारामती वार्तापत्र
दि रयत को ऑपरेटिव्ह बँक ली सातारा या बँकेच्या बारामती शाखेच्या 84 व्या वर्धापन दिनानिमित्त बारामती शाखा कार्यक्षेत्रातील गुणवंत विद्यार्थांचा गुणगौरव समारंभ पार पडला.
यावेळी कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून रयत बँकेचे चेअरमन श्री नंदकिशोर गायकवाड होते.तर प्रमुख पाहुणे म्हणून जनरल बॉडी सदस्य श्री लालासाहेब नलवडे,पुणे विभागाचे विभागीय अधिकारी श्री संजय मोहिते,मॅनेजिंग कौन्सिल सदस्य श्री सुभाष लकडे,टेक्निकल विद्यालयाचे प्राचार्य श्री कल्याण देवडे उपस्थित होते.
यावेळी इ 5 वी ,8 वी शिष्यवृत्ती परीक्षा,रयत प्रज्ञा शोध परीक्षा,NMMS परीक्षा,MTS परीक्षा,10 वी,12 वी तसेच विविध स्पर्धा परीक्षेत यशस्वी झालेल्या विद्यार्थांचा प्रमाणपत्र,ट्रॉफी,व रोख रक्कम देऊन सन्मान करण्यात आला.तसेच सेट परीक्षा प्राप्त श्री विकास जाधव,बालाजी बोंबडे,श्री भुजबळ या रयत सेवकांचा ही यावेळी सन्मान करण्यात आला.
विभागीय अधिकारी श्री संजय मोहिते यांनी आपल्या मनोगतात बँकेच्या कामाचे कौतुक करत गुणवंत विद्यार्थांचे अभिनंदन केले. यावेळी अध्यक्षीय भाषणात श्री नंदकिशोर गायकवाड यांनी रयत बँकेची चालू असलेली कामगिरी सांगत सभासदांसाठी बँकेतर्फे राबवत असलेल्या विविध योजनांची माहिती दिली.तसेच सर्व यशस्वी विद्यार्थांचे अभिनंदन करत पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.
या कार्यक्रमाचे आयोजन शाखा समितीचे चेअरमन श्री अशोक कोलते,सभासद प्रतिनिधी श्री वैभव यादव,शाखाधिकारी सौ.उल्का पवार यांनी केले. सदर कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्री निलेश गायकवाड यांनी केले. प्रास्ताविक श्री गणेश कोंढाळकर यांनी केले तर अशोक कोलते यांनी आभार मांडले.