ह
बारामती च्या शिरपेचात मानाचा तुरा.
कु.आरती पवार उपविभागीय पोलीस अधिकारी
कु.विक्रांत जाधव बनले नायब तहसीलदार
बारामती:वार्तापत्र स्पर्धा परीक्षेच्या माध्यमातून बारामती च्या शिरपेचात मनाचा तुरा खोवला आहे .
येथील बारामती नगर परिषदे मध्ये कर प्रशासकीय अधिकारी म्हणून कार्यरत असलेल्या शहरातील भिगवण रोड वरील संभाजी नगर येथील कु.आरती राजेंद्र पवार यांनी अफाट
मेहनत आणि अभ्यासाच्या जोरावर थेट उप विभागीय पोलीस अधिकारी (D.Y.S.P) पदाला गवसणी घातली आहे.या आधी देखील त्यांची मंत्रालया मध्ये सहाय्यक कक्ष अधिकारी म्हणून
निवड झाली होती.
त्याच सोबत बारामती येथील कु.विक्रांत कृष्णा जाधव यांनी देखील नायब तहसिलदार पदा पर्यंत मजल मारत आपल कर्तृत्व
सिद्ध केलं आहे.विक्रांत हे देखील सध्या मंत्रालया मध्ये सहाय्यक कक्ष अधिकारी म्हणून कार्यरत आहेत.
बारामतीतील ह्या दोघांनी उत्तुंग यशाला गवसणी घातल्या मुळे सर्वत्र त्यांचं कौतुक होत आहे.
- उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते विद्याप्रतिष्ठान च्या सभागृहात पवार व जाधव यांचा सत्कार करण्यात आला.