स्थानिक
बारामती सहकारी औद्योगिक वसाहतीच्या अध्यक्षपदी रणजित पवार तर उपाध्यक्षपदी मनोज पोतेकर बिनविरोध निवड
निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून अमर गायकवाड यांनी काम पाहिले.

बारामती सहकारी औद्योगिक वसाहतीच्या अध्यक्षपदी रणजित पवार तर उपाध्यक्षपदी मनोज पोतेकर बिनविरोध निवड
निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून अमर गायकवाड यांनी काम पाहिले.
बारामती वार्तापत्र
बारामती सहकारी औद्योगिक वसाहतीची पंचवार्षिक निवडणूक नुकतीच बिनविरोध झाली. संस्थेच्या अध्यक्षपदी रणजित दिनकरराव पवार यांची फेरनिवड करण्यात आली. उपाध्यक्षपदी मनोज पोतेकर यांची एकमताने निवड झाली.
या निवडणुकीमध्ये रणजित पवार, मनोज पोतेकर, अविनाश लगड, सुनील पोटे, चेतन शहा, अनिल तुपे, यश संघवी, मेहूल दोशी, प्रदीप भोईटे, निशांत गवळी, जावेद शिकीलकर, मालती गलबले, हर्षा दोशी यांची संचालक म्हणून बिनविरोध निवड झाली.
निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून अमर गायकवाड यांनी काम पाहिले. या प्रसंगी सहायक निबंधक प्रमोद दुरगुडे व संस्थेचे सचिव रोहिदास हिरवे उपस्थित होते.