बारामती तालुक्यातील झैनबिया स्कूलची महिला मॅरेथॉन स्पर्धा उत्साहात साजरा
२७८ महिला व मुलींनी सहभाग

बारामती तालुक्यातील झैनबिया स्कूलची महिला मॅरेथॉन स्पर्धा उत्साहात साजरा
२७८ महिला व मुलींनी सहभाग
बारामती वार्तापत्र
बारामती तालुक्यातील कटफळ येथील अब्बास मोहम्मद हुसेन एज्युकेशन ट्रस्ट संचलित झैनबिया इंग्लिश मिडियम स्कूल कटफळच्या इयत्ता नववीच्या विद्यार्थ्यांनी व एचपी गॅस एजन्सी यांच्या संयुक्त माध्यमाने संरक्षण क्षमता महोत्सव सक्षम यांनी महिला मॅरेथॉन उपक्रम आयोजित केली होती.
यांमध्ये १ किलोमीटर, २.५ किलोमीटर , ५ किलोमीटर स्पर्धेचे अंतर होते. यावेळीआठ ते पन्नास वयोगटातील महिला व मुलींचा सहभाग होता. तसेच या मॅरेथॉन मध्ये बारामती तालुक्यातील शाळा अकॅडमी व क्लब च्या अशा २७८ महिला व मुलींनी सहभाग घेतला.
यावेळी कबड्डीपटू दादा आव्हाड सर, एचपी गॅस एजन्सीचे शब्बीर बारामतीवाला, अलीसगर बारामतीवाला ,कटफळ ग्रामपंचायतचे सरपंच विजय कांबळे, शाळेच्या प्राचार्यां. इन्सिया नासिकवाला आदी यांच्या हस्ते झेंडा फडकून मॅरेथॉनची सुरुवात करण्यात आली.
या स्पर्धेत वेगवेगळ्या अंतरानुसार धावलेल्या विजेत्यांची नावे पुढीलप्रमाणे: ५ किलोमीटर मध्ये प्रथम क्रमांक सकीना हकीमजीवाला, द्वितीय क्रमांक शुभांगी पवार, तृतीय क्रमांक रुक्मिणी चव्हाण व चतुर्थ क्रमांक सुहासिनी नाझीरकर यांनी मिळविला. व २.५किलोमीटर मध्ये प्रथम क्रमांक श्वेता बगाडे, द्वितीय क्रमांक साक्षी उपाध्याय, तृतीय क्रमांक माधुरी थोरात व चतुर्थ क्रमांक स्वाती मोरे यांनी मिळविला.
१ किलोमीटर मध्ये प्रथम क्रमांक सानवी घोलप, द्वितीय क्रमांक अथर्व जराड व तृतीय क्रमांक रिधानश सावंत यांनी मिळविला. या सर्व यशस्वी स्पर्धकांना विविध आकर्षक बक्षिसे देऊन सत्कार करण्यात आला.
या मॅरेथॉनसाठी चंदूकाका सराफ, भंडारी सराफ, हुसेन हार्डवेअर अँड फ्रेंड्स, कोहिनूर शूज, राज इंटरप्राईजेस, जावेद हबीब, आनंद वॉच, चंद्रकला, माहेरचे अंगण, न्यू अलीफ मोबाईल ॲक्सेसरीज, साकल्प वर्ल्ड, टी.आर.टाळकुटे असो., डॉ अकोलेकर, वैष्णवी ठिबक एजन्सी, कोठारी, बाऊली कंपनी व कटफळ ग्रामपंचायत या सर्वांचे सहकार्य लाभले. यामधून इयत्ता नववीच्या विद्यार्थ्यांनी टीम वर्क , टाईम मॅनेजमेंट, फायनान्स मॅनेजमेंट, कम्युनिकेशन, सोशल रिलेशन , प्रोग्राम मॅनेजमेंट अशा अनेक गोष्टी मॅरेथॉन ऑर्गनाईज करताना शिकले.अशाप्रकारे महिला मॅरेथॉन स्पर्धा यशस्वीरित्या पार पडली.