स्वच्छ मुख अभियानाअंतर्गत मएसो कै. ग. भि.देशपांडे विद्यालयात दंत आरोग्य विषयक व्याख्यान संपन्न
दात स्वच्छतेच्या विविध पद्धती याविषयी सखोल असे मार्गदर्शन

स्वच्छ मुख अभियानाअंतर्गत मएसो कै. ग. भि.देशपांडे विद्यालयात दंत आरोग्य विषयक व्याख्यान संपन्न
दात स्वच्छतेच्या विविध पद्धती याविषयी सखोल असे मार्गदर्शन
बारामती वार्तापत्र
पुण्यश्लोक आहिल्यादेवी होळकर शासकीय महाविद्यालय व सर्वोपचार रुग्णालय बारामती यांच्या वतीने स्वच्छ मुख अभियानाअंतर्गत दंतशास्त्र विभागाच्या वतीने म . ए.सो.कै.ग भि .देशपांडे विद्यालयातील विद्यार्थ्यांसाठी आरोग्य विषयक व्याख्यान आयोजित करण्यात आले होते.
यावेळी डॉ. संदीप वणवे यांनी मौखिक आरोग्य विषयक माहिती, मौखिक आरोग्याची काळजी कशी घ्यावी? स्वस्थआरोग्याच्या चांगल्या सवयी कोणत्या? मौखिक आजार , मुख कर्करोग कशामुळे होतो? दात स्वच्छ करण्याची साधने , दात स्वच्छतेच्या विविध पद्धती याविषयी सखोल असे मार्गदर्शन केले. यावेळी या विभागाचे प्रमुख डॉ. सुबोध सोनटक्के यांनी विद्यार्थ्यांसाठी प्रशमंजुषा आयोजित केली. डॉ. मानसी शेळके यांनी विचारलेल्या प्रश्नांना विद्यार्थिनींनी उत्तरे दिली.
या कार्यक्रमासाठी प्रशालेच्या मुख्याध्यापिका सौ. रोहिणी गायकवाड, उपमुख्याध्यापक श्री. राजाराम गावडे पर्यवेक्षक शेखर जाधव, पर्यवेक्षिका सौ. जयश्री शिंदे ,पर्यवेक्षक श्री. दिलीप पाटील प्रशालेतील शिक्षक , शिक्षिका व विदयार्थी विद्यार्थीनी उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सौ. जिज्ञासा गाढवे यांनी केले. आभार श्री रवींद्र गडकर यांनी व्यक्त केले.