माळेगाव बु

पुन्हा पवार विरुद्ध पवार लढत !;बारामती तालुक्यातील माळेगाव कारखान्याची निवडणूक रंगतदार होण्याची शक्यता…

कारखान्याचे 19,549 सभासद

पुन्हा पवार विरुद्ध पवार लढत !;बारामती तालुक्यातील माळेगाव कारखान्याची निवडणूक रंगतदार होण्याची शक्यता…

कारखान्याचे 19,549 सभासद

बारामती वार्तापत्र 

सहकारी साखर कारखान्याचे निवडणूक ही राजकीय पक्षावर नाही तर शेतकऱ्यांच्या विचारावर लढली जाते,साखर कारखाना हा शेतकऱ्यांच्या मुळे चालतो, बारामती तालुक्यातील माळेगाव सहकारी साखर कारखाना हा ज्येष्ठ नेते खासदार शरद पवार यांचा कारखाना म्हणून राज्यात ओळखला जातो, जेष्ठ नेते शरद पवार हे स्वतः त्या कारखान्याचे सभासद सुद्धा आहेत, त्यांनी याच साखर कारखान्याच्या विकासा साठी खूप काही विकास कामे केलेली आहेत, असे असताना सुद्धा ऊस उत्पादक शेतकरी वर्गामध्ये मध्ये सध्या नाराजी आहे, कारखान्याचे स्वाभिमानी सभासद यांची जर मागणी असेल तर आम्ही पूर्ण ताकद त्यांच्या पाठीशी लावणार आहोत.

असे स्पष्ट संकेत युवा नेते युगेंद्र पवार यांनी दिले आहेत .

राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष्याचे (शरद पवार ) युवा नेते युगेंद्र पवार त्यांनी आज बारामतीत प्रसार माध्यमांशी संवाद साधताना आपले मत व्यक्त केले, श्री. युगेंद्र पवार बोलताना म्हणाले, “ज्येष्ठ नेते शरद पवार यांनी माळेगाव सहकारी साखर कारखान्याच्या विकासासाठी खूप भरीव कामगिरी केली आहे, कारखान्याच्या सभासदांचा विचार करून सहवीज प्रकल्प, अभियांत्रिकी महाविद्यालय, पॉलिटेक्निकल महाविद्यालय, कारखान्या अंतर्गत विविध सुविधा उपलब्ध करून दिले आहेत, कारखान्याच्या ऊस उत्पादक सभासदांची आणि कार्यकर्त्यांची एक बैठक सुद्धा आयोजित केली होती, या बैठकीमध्ये सभासदांचे विचार,अडचणी आम्ही समजावून घेतल्या आहेत , या बैठकीमध्ये अनेक शेतकऱ्याचे मत असे होते की,”आपण या निवडणुकीमध्ये शेतकऱ्यांच्या मागे उभे राहिले पाहिजे, शेतकऱ्यांना ताकद दिली पाहिजे,” आता या पुढील होणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमध्ये सुद्धा कार्यकर्त्यांच्या मागणीनुसार कार्यकर्त्यांना आम्ही ताकद देणार आहोत, जिल्हा परिषद, ग्रामपंचायत, नगरपालिका या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या येणाऱ्या निवडणुकीत सुद्धा आम्ही राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार) पक्षाकडून लढण्याच्या विचार करीत आहोत, शेवटी आमचाही राजकीय पक्ष आहे, आणि पक्षाच्या वाढीसाठी आम्ही सदैव कार्यकर्त्यांच्या मागे खंबीर पणे उभे राहिलेच पाहिजे,असे संकेत सुद्धा युवा नेते युगेंद्र पवार यांनी दिले आहेत, राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार ) हे आपली माळेगाव साखर कारखान्याची सत्ता पुन्हा मिळविण्यासाठी प्रयत्नशीर राहणार असल्याने या वेळी निवडणुकीत मोठी चुरस निर्माण होणार आहे, माळेगाव सहकारी साखर कारखान्याची निवडणूक अद्याप जाहीर झालेली नसली तरी राजकीय हालचालींना कमालीचा वेग आल्याचे दिसून येत आहे.

अजित पवार यांचे राजकीय बळकटीकरण

बारामती तालुक्यातील माळेगाव, सोमेश्वर हे सहकारी आणि अंबालिका, दौंड शुगर हे खासगी साखर कारखाने अजित पवार यांच्या प्रभावाखाली आहेत. या कारखान्यांमुळे त्यांचे राजकीय बळ अधिक मजबूत झाले आहे. हे चारही कारखाने आज चांगल्या आर्थिक स्थितीत असून, साखर उत्पादन, इथेनॉल निर्मिती आणि गाळप क्षमतेत राज्यात आघाडीवर आहेत.

माळेगाव कारखान्याची निवडणूक महत्त्वाची का?

माळेगाव कारखान्यावर पूर्वी सहकार क्षेत्रातील जाणकार आणि भाजपचे माजी नेते चंद्रराव तावरे तसेच माजी अध्यक्ष रंजन काका तावरे यांचे नियंत्रण होते. मात्र, नंतर हा कारखाना अजित पवार यांच्या हाती गेला. सध्या या कारखान्याचे 19,549 सभासद असून, बारामती तालुक्यातील राजकीय समीकरणांमध्ये या कारखान्याची महत्त्वपूर्ण भूमिका आहे. त्यामुळेच शरद पवार गटाने या निवडणुकीत सक्रिय सहभाग घेण्याचे ठरवले आहे. ही निवडणूक स्थानिक राजकारणात मोठ्या घडामोडींना चालना देऊ शकते. अजित पवार विरुद्ध शरद पवार गट यांच्यातील ही निवडणूक कोणत्या दिशा घेईल, याकडे संपूर्ण राज्याचे लक्ष लागले आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!