गुणवतांचा सन्मान ही काळाची गरज: प्रा अजिनाथ चौधर
रुई मध्ये विविध क्षेत्रातील गुणवतांचा सत्कार

गुणवतांचा सन्मान ही काळाची गरज: प्रा अजिनाथ चौधर
रुई मध्ये विविध क्षेत्रातील गुणवतांचा सत्कार
बारामती वार्तापत्र
जिद्द, चिकाटी व आत्मविश्वास च्या जोरावर यश मिळवल्यावर गुणवतांचा सन्मान करून त्याचा विचार व आदर्श इतरांनी घेऊन सामाजिक समृद्धीचा वारसा पुढे चालवावा असे प्रतिपादन प्रा अजिनाथ चौधर यांनी केले.
रुई वंजारवाडी समृद्ध विचार मंच यांच्या वतीने महाराष्ट्र लोकसेवा आयोग परीक्षेत यशस्वी झालेले ,वैदकीय पदवी प्राप्त व विविध क्षेत्रात डॉक्टरेट पदवी,बढती, सेवानिवृत्ती ,खेळ आदी क्षेत्रातील गुणवंतांचा सन्मान करण्यात आला या प्रसंगी पुणे जिल्हा राष्ट्रवादी चे सरचिटणीस व समृद्ध विचार मंच चे संस्थापक प्रा. अजिनाथ चौधर मार्गदर्शन करत होते
या प्रसंगी विद्या प्रतिष्ठानच्या कला विज्ञान वाणिज्य महाविद्यालयातील प्रा. संजय खिलारे, सहाय्यक उपनिबंधक सौ रूपाली कदम,डॉ राजाराम चौधर, विठ्ठल चौधर, कुमारी मोनाली चौधर,वृषाली घोडके, भगवान चौधर, संत बाळूमामाचे भक्त शरद मामा चौधर,रुई चे मा.सरपंच मच्छिंद्र चौधर,दादासाहेब दत्तू चौधर, साईनाथ चौधर, विजय मालुसरे, अजित खाडे, शिवाजी मालुसरे, महादेव खाडे, संजय साळुंखे ,ज्ञानदेव साळुंखे, मधुकर शिरसाट, केशव चौधर,सौ सुरेखा चौधर, बाळासाहेब मालुसरे, नाना घोडके,दीपक कांबळे आदी उपस्तीत होते.
सामान्य परिस्थिती असताना ध्येय पूर्ण करण्यासाठी कठोर परिश्रम घेऊन यश मिळवल्यावर सामाजिक भान व जाण ठेवत कार्यरत रहावे असा सल्ला प्रा अजिनाथ चौधर यांनी दिला.
मोहिनी मुकुंद चौधर, ऋतुजा नवनाथ चौधर, सौ सायली अतुल ढोले, अमर सोमनाथ चौधर, विशाल दत्तात्रय पवार, दिशा महादेव गोरे ,डॉ प्रेरणा जगन्नाथ चौधर व वृषाली नाना घोडके विद्या प्रतिष्ठान च्या पाटी एकांकिका मधील कलाकार, श्रेया किशोर गरजे राज्यस्तरीय पुरस्कार प्राप्त व भगवान चौधर व संदेश ओमासे पोलीस उपनिरीक्षक पदी निवड आणि महेश गर्जे क्रीडा क्षेत्रातील योगदान बदल आदींचा सन्मान या प्रसंगी करण्यात आला.
समाजाचे ऋण फेडण्यासाठी कटिबद्ध राहवू असे सत्कार मूर्तींनी सांगितले.
सूत्रसंचालक डॉ राजाराम चौधर व आभार प्रदर्शन विठ्ठल चौधर यांनी केले.