माजी मंत्री हर्षवर्धन पाटील यांना धक्का;कट्टर समर्थक ॲड.मयूर शिंदेंचा पुन्हा भाजपमध्ये प्रवेश
राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाला सोडचिठ्ठी

माजी मंत्री हर्षवर्धन पाटील यांना धक्का;कट्टर समर्थक ॲड.मयूर शिंदेंचा पुन्हा भाजपमध्ये प्रवेश
राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाला सोडचिठ्ठी
इंदापूर प्रतिनिधी –
माजी मंत्री हर्षवर्धन पाटील यांचे इंदापूरातील कट्टर समर्थक अॅड. मयूर शिंदे यांनी राष्ट्रवादी काँग्रेस (SP) पक्षाला सोडचिठ्ठी देत पुन्हा स्वगृही म्हणजेच भाजपमध्ये प्रवेश केला आहे.
भाजपचे जिल्हाध्यक्ष वासुदेव काळे यांच्या उपस्थितीत दौंड येथे अॅड. मयूर शिंदे यांनी भाजपमध्ये प्रवेश केला. यावेळी इंदापूर तालुकाध्यक्ष तेजस देवकाते, शहराध्यक्ष किरण गणबोटे, जिल्हा सचिव प्रेमकुमार जगताप, रवी पाटील, वैभव सोलनकर, माजीशहराध्यक्ष माऊली वाघमोडे उपस्थित होते. अॅड. मयूर शिंदे यांनी यापूर्वी भाजपचे इंदापूर युवकचे शहराध्यक्ष, इंदापूर युवकचे काम पाहिले आहे. माजी मंत्री हर्षवर्धन पाटील यांच्यासोबत त्यांनी राष्ट्रवादी (SP ) पक्षात प्रवेश केला होता; परंतु मंगळवारी (दि.4) त्यांनी पुन्हा एकदा भाजपमध्ये प्रवेश केला आहे. अॅड. मयूर शिंदे इंदापूर नगरपरिषदेसाठी इच्छुक असल्याने आता ते भाजपकडून नगरपरिषदेची निवडणूक लढवण्याची शक्यता वर्तवली जात आहे.