बारा मान्यवरांची भीमपुत्र आयडॉल २०२५ साठी निवड
निवड झालेल्या सर्वांची माहिती देणाऱ्या पुस्तकाचे यावेळी प्रकाशन

बारा मान्यवरांची भीमपुत्र आयडॉल २०२५ साठी निवड
निवड झालेल्या सर्वांची माहिती देणाऱ्या पुस्तकाचे यावेळी प्रकाशन
बारामती वार्तापत्र
संविधान विचार मंच, बारामती आयोजित राज्यस्तरीय भीमपुत्र आयडॉल २०२५ उपक्रमासाठी विविध क्षेत्रातील बारा मान्यवरांची निवड करण्यात आली आहे.
२० एप्रिल रोजी बारामती येथे होणाऱ्या सोहळ्यात या मान्यवरांना सन्मानित केले जाणार आहे.
मुंबई येथील प्रसिद्ध उद्योजिका कल्पना सरोज, आग्रा येथील कोडिंग मास्टर देवांश धनगर, वीज वितरण क्षेत्रातील आंतरराष्ट्रीय स्तरावरील तज्ञ मुरहरी केळे, सामाजिक कार्यकर्त्या अकलूजच्या स्वयंप्रभादेवी मोहिते पाटील, आंतराष्ट्रीय किर्तीचे बौद्ध विचारांचे अभ्यासक लखनौचे राजेश चंद्रा, आंतराष्ट्रीय सामाजिक कार्यकर्ते हैद्राबादचे शेक चांद पाशा, अहिल्यानगरच्या प्रसिद्ध यु ट्युबर आपली आजी उर्फ सुमन धामणे, अहिल्यानगरचे चार्टर्ड अकाऊंटंट शंकर अंदानी, पाणी चित्रपटाचे खरे नायक नांदेडचे हनुमंत उर्फ बाबुराव केंद्रे, क्रिडा वैद्यकीय क्षेत्रातील पहिले भारतीय डॉक्टर बारामतीचे डॉ. रोहन अकोलकर, नळदुर्गचे सामाजिक कार्यकर्ते मारुती बनसोडे, जेजुरी येथील उद्योजक पांडुरंग सोनावणे यांचा यामध्ये समावेश आहे.
नोबेल पारितोषक निवड समितीचे सदस्य डॉ. सुधीर तारे, जेष्ठ नागरिक संघ, महाराष्ट्र राज्याचे माजी अध्यक्ष माधव जोशी, पुणे विद्यापीठातील मानववंश शास्र विभागाच्या माजी प्रमुख प्रा. अंजली कुरणे आणि माजी सनदी अधिकारी डॉ. वेंकटसाई चेलसानी यांच्या मार्गदर्शनाने ही निवड करण्यात आली.
निवड झालेल्या सर्वांची माहिती देणाऱ्या पुस्तकाचे यावेळी प्रकाशन होणार आहे. या सर्वांच्या कामाची ओळख करुन देणाऱ्या त्यांच्या मुलाखती सोशल मिडियाव्दारे प्रसिद्ध केल्या जाणार आहेत, अशी माहिती संविधान विचार मंचाचे अध्यक्ष राजेश कांबळे व सचीव घनश्याम केळकर यांनी दिली.