” डॉ. श्री. नानासाहेब धर्माधिकारी प्रतिष्ठानकडून बारामतीमध्ये स्वच्छता मोहीम “
457 श्री सदस्यांनी सहभाग घेतला

” डॉ. श्री. नानासाहेब धर्माधिकारी प्रतिष्ठानकडून बारामतीमध्ये स्वच्छता मोहीम “
457 श्री सदस्यांनी सहभाग घेतला
बारामती वार्तापत्र
श्री नानासाहेब धर्माधिकारी प्रतिष्ठान ही एक सेवाभावी संस्था असून गेल्या 80 वर्षापासून या प्रतिष्ठानकडून श्री समर्थ बैठकीच्या माध्यमातून समाज प्रबोधन करण्याचे अखंड कार्य सुरू आहे. समाजामध्ये असलेले अज्ञान, अंधश्रद्धा तसेच अनिष्ट रूढी परंपरा व व्यसनाधीनता याचे आपल्या आयुष्यावर होणारे दुष्परिणाम याची जाणीव करून दिली जाते तसेच त्यापासून वेगळे होण्याची शिकवण दिली जाते.
प्रतिष्ठानच्या माध्यमातून अनेक समाज उपयोगी अभियान चालवली जातात जसे वृक्ष लागवड व संवर्धन, रक्तदान शिबिर, जल पुनर्भरण, विहिरी व तलावांच्या गाळ काढणे, स्पर्धा परीक्षा करता विद्यार्थ्यांना मोफत मार्गदर्शन, शालेय विद्यार्थ्यांना मोफत शालेय साहित्य वाटप, मोफत श्रवण यंत्राचे वाटप, आपल्या निरोगी आयुष्यासाठी जशी मनाची स्वच्छता गरजेची आहे त्याचबरोबर परिसराची स्वच्छता आवश्यकता आहे व स्वच्छतेचे महत्त्व सर्व पर्यंत पोचवावे यासाठी आदरणीय पद्मश्री महाराष्ट्र भूषण डॉ. आप्पासाहेब धर्माधिकारी व
डॉ. सचिन दादा धर्माधिकारी यांच्या मार्गदर्शनाखाली रविवार दिनांक 2 मार्च 2025 रोजी संपूर्ण देशभरात एकाच वेळी स्वच्छता अभियान आयोजित केलेले आहे.
बारामती येथे प्रतिष्ठानच्या वतीने कृषी उत्पन्न बाजार समिती जळोची बारामती येथे अभियानात 457 श्री सदस्यांनी सहभाग घेतला व ओला कचरा 8 टन व सुका कचरा 13.5 टन असा एकूण 21.5 टन कचरा संकलन करून 21, 281 चौ. मीटर व 4.5 किलोमीटर रोड परिसर स्वच्छ केला आहे.
“या स्वच्छता अभियानामध्ये दि. बारामती सहकारी बँकेचे चेअरमन श्री. सचिनशेठ सदाशिवराव सातव व बँकेचे व्हाईस चेअरमन श्री. विजयराव प्रभाकरराव गालिदे तसेच कृषी उत्पन्न बाजार समिती बारामतीचे सचिव श्री. अरविंद जगताप व संचालक श्री. संतोष आटोळे व पत्रकार मित्र, मिडिया प्रमुख उपस्थित होते. व या स्वच्छता अभियानास बारामती नगरपालिकेने संपूर्ण सहकार्य केले.
धर्माधिकारी प्रतिष्ठान तर्फे आज संपूर्ण देशभर व विदेशामध्ये आजच्या दिवशी हे स्वच्छता अभियान राबविण्यात आले. या स्वच्छता अभियानाचे बारामती मधील सर्व स्तरातील नागरिकांमधून कौतुक होत आहे.