उपमुख्यमंत्र्यांच्या बारामतीत जागतिक महिला दिनी न्याय मिळण्यासाठी महिलांचे प्रशासकीय भावना समोर लाक्षणिक उपोषण सुरू….
उपमुख्यमंत्री अजित पवार , खासदार सुप्रिया सुळे यांच्या मतदारसंघातील महिलांचे उपोषण.

उपमुख्यमंत्र्यांच्या बारामतीत जागतिक महिला दिनी न्याय मिळण्यासाठी महिलांचे प्रशासकीय भावना समोर लाक्षणिक उपोषण सुरू….
उपमुख्यमंत्री अजित पवार , खासदार सुप्रिया सुळे यांच्या मतदारसंघातील महिलांचे उपोषण..
आज जागतिक महिला दिनाच्या दिवशी सुरू केलेल्या उपोषणावर प्रशासकीय अधिकाऱ्याकडून तोडगा नाहीच..
बारामती वार्तापत्र
बारामती येथील प्रशासकीय भवना समोर जागतिक महिला दिनी झारगडवाडी गावातील महिलांनी त्यांच्या घराकडे येणारा शासनाकडून निधी मंजूर असलेला रस्ता शरद पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या पदाधिकाऱ्यांनी राजकीय द्वेषापोटी आणि मानसिक त्रास देण्याच्या हेतूने अडवला आहे. यामुळे आपली मागणी पूर्ण व्हावी यासाठी बारामती येथील प्रशासकीय भवनासमोर आपल्या हक्काच्या मागणीसाठी महिलांनी लाक्षणिक उपोषणाला सुरुवात केली आहे.
याबाबत उपमुख्यमंत्री अजित पवार, राज्यसभेच्या खासदार सुनेत्रा पवार, यांना याबाबत निवेदन देण्यात आले होते यावर उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी संबंधित अधिकाऱ्यांना तातडीने पोलीस बंदोबस्तात रस्ता करण्याचे आदेश दिलेले होते.
मात्र गेली दीड वर्षापासून रस्ता होईना यामुळे महिलांनी जागतिक महिला दिनी न्याय मिळावा यासाठी बारामतीच्या प्रशासकीय भावना समोर लाक्षणिक उपोषण सुरू केले आहे..
संबंधित अधिकारी यांनी रस्ता अडवणाऱ्यावर कारवाई करून रस्त्याचा प्रश्न मार्गी लावावा जोपर्यंत उपोषण सोडणार नाही असा इशारा उपोषण कर्त्या महिला वनिता बोरकर आणि छाया बोरकर यांनी दिला आहे.