गोजुबावीत महिला दिनाच्या निमित्ताने शक्ती पथकाचे महिलांना मार्गदर्शन व महिलांसाठी विविध स्पर्धांचे आयोजन
कायदेविषयक तरतुदी या विषयावर मार्गदर्शन

गोजुबावीत महिला दिनाच्या निमित्ताने शक्ती पथकाचे महिलांना मार्गदर्शन व महिलांसाठी विविध स्पर्धांचे आयोजन
कायदेविषयक तरतुदी या विषयावर मार्गदर्शन
बारामती वार्तापत्र
जागतिक महिला दिनाच्या निमित्ताने गोजुबावीत शक्ती पथकाच्या प्रमुख महिला पोलिस वनिता कदम यांनी मार्गदर्शन केले.त्यांनी महिला सुरक्षा,सोशल मीडिया चा वापर , कायदेविषयक तरतुदी या विषयावर मार्गदर्शन केले.यावेळी मोठ्या प्रमाणात महिला उपस्थित होत्या.
उल्लेखनीय कार्य करणाऱ्या महिलांचा यावेळी पुस्तक व गुलाबपुष्प देऊन सन्मान करण्यात आला.तसेच उपस्थित सर्व महिलाना एक गुलाबाचे रोप देऊन सन्मानित करण्यात आले.
तसेच सर्व महिलांसाठी संगीत खुर्ची,प्रश्नमंजुषा,तळ्यात मळ्यात असे अनेक फनी गेम्स घेण्यात आल्या.या स्पर्धामध्ये प्रथम क्रमांक मिळवलेल्या सौ.पल्लवी जाधव यांना पैठणी,द्वितीय क्रमांक प्राप्त सौ.रुपाली जाधव यांना मिक्सर,तृतीय क्रमांक प्राप्त सौ.कावेरी जाधव यांना फॅन तर इतर उत्तेजनार्थ विजेत्या स्पर्धकांना इस्त्री अशी बक्षिसे देण्यात आली.
यावेळी महिलांसाठी स्नेहभोजनाचे आयोजन करण्यात आले होते.या कार्यक्रमाचे आयोजन संत सावतामाळी तरुण मंडळ गोजुबावी यांच्या वतीने करण्यात आले होते.कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्री विकास जाधव व सौ.स्वाती आटोळे यांनी केले तर आभार अप्पासाहेब जाधव यांनी मांडले.