स्थानिक

राज्य बॉयलर अटेंडंट कामगार मेळावा संपन्न

व्ही आर बॉयलर ला उत्कृष्ट सेवेसाठी सन्मान

राज्य बॉयलर अटेंडंट कामगार मेळावा संपन्न

व्ही आर बॉयलर ला उत्कृष्ट सेवेसाठी सन्मान

बारामती वार्तापत्र 

बॉयलर क्षेत्रातील कर्मचारी यांनी आत्याधुनिक तंत्रज्ञान च्या साह्याने कमी वेळेत जास्त काम करावे व विचारांची या क्षेत्रातील ज्ञानाची आदान प्रदान करण्यासाठी प्रत्यन शील रहावे असे प्रतिपादन राज्याचे मा.संचालक बाष्पके संचालनालय चे सतीश बधे यांनी केले.

बॉयलर व बॉयलर ॲक्सेसरीजचे उत्पादन ते वापरापर्यंतच्या कार्याची निगडित असणाऱ्या सर्व अधिकारी आणि कर्मचारी करता महाराष्ट्र राज्य बॉयलर अटेंडंट कामगार सेना यांच्या वतीने भव्य बॉयलर कामगार मेळावा चे आयोजन बारामती येथे शुक्रवार दि २९ मार्च रोजी करण्यात आले होते.

या प्रसंगी राज्याचे बाष्पके संचालनाचे मा. सहसंचालक उमेश मदने, गजानन चौगुले, बारामती इंडस्ट्रियल मॅन्युफॅक्चरिंग असोसिएशनचे अध्यक्ष धनंजय जामदार एमआयडीसीचे कार्यकारी अभियंता विजय पेटकर , व्ही आर बॉयलर सोल्युशन चे संचालक राजाराम सातपुते, श्लोक शिवम सेल्स अँड सर्विसेस चे संचालक अशोक लोखंडे, मराठा इंटेलिजन्स सिक्युरिटी सर्विसेस चे संचालक प्रवीण जगताप , बॉयलर अटेंडंट जनरल कामगार सेनेचे संस्थापक अध्यक्ष अंकुश वाघचौरे व इतर सहकारी उपस्थित होते.

विविध मान्यवरांनी बॉयलर क्षेत्रातील सुरक्षितता,दक्षता,शासनाची धोरणे आदी बाबत मार्गदर्शन केले.

देशातील विविध कंपन्या मध्ये बॉयलर क्षेत्रातील सेवा व सुविधा,देखभाल दुरुस्ती चे काम करत असताना शासनाच्या नियमांचे पालन करत ग्राहकांना उत्तम गुणवत्ता व दर्जा दिल्याबद्दल व्ही आर बॉयलर चे संचालक राजाराम सातपुते याना सन्मानित करण्यात आले सूत्रसंचालन श्री सावळेपाटील यांनी केले तर आभार प्रवीण जगताप यांनी मानले.

Back to top button