शैक्षणिक

डॉ. शरदचंद्र पवार कृषी व संलग्न महाविद्यालयात यूपीएससी – स्पर्धा परीक्षा मार्गदर्शनपर चर्चासत्र संपन्न

प्रत्येकजण युनिक आहे

डॉ. शरदचंद्र पवार कृषी व संलग्न महाविद्यालयात यूपीएससी – स्पर्धा परीक्षा मार्गदर्शनपर चर्चासत्र संपन्न

प्रत्येकजण युनिक आहे.

बारामती वार्तापत्र 

स्पर्धा सर्व क्षेत्रात आहे. ती काळाची गरज आहे. कोणत्याही क्षेत्रात यशस्वी व्हायचे असेल
तर पूर्ण तयारीने उतरा. स्वतःवर विश्वास ठेवा.
आपली तुलना इतरांशी करू नका.

जे करताय ते चांगल्या पद्धतीने करा. असे प्रतिपादन प्रा. कृष्णा भोकरे,संस्थापक- कृष्णा भोकरे इन्स्टिटयूट फॉर ऍग्री ऑपशनल आणि फॅकलटी वाजिराम अँड रवी इन्स्टिटयूट फॉर आयएएस एक्झामिनेशन, दिल्ली यांनी केले. पुढे ते म्हणाले कि, पदवीनंतर स्पर्धा परीक्षा देणार असाल तर पदवीला असलेलया सर्व विषयांचा पदवीतच व्यवस्थित अभ्यास करा.

कोणत्याही स्पर्धा परीक्षेचा अभ्यास सुरु करण्यापूर्वी त्या परीक्षेचा अभ्यासक्रम व्यवस्थित समजून घ्या. परीक्षेत यशस्वी व्हायचं असेल तर त्या परीक्षेचा सराव खूप महत्वाचा आहे.

डॉ. शरदचंद्र पवार कृषी व सलंग्न महाविद्यालय, बारामती आणि वाजिराम अँड रवी इन्स्टिटयूट फॉर
आयएएस एक्झामिनेशन, दिल्ली यांच्या सयुंक्त विद्यमाने आयोजित यूपीएससी – स्पर्धा परीक्षा
मार्गदर्शनपर चर्चासत्रात ते बोलत होते.

या चर्चासत्राचे आयोजन ॲग्रिकल्चरल डेव्हलपमेंट ट्रस्टचे प्रमुख मा. राजेंद्र पवार, विश्वस्त
सौ. सुनंदा पवार, ट्रस्टचे इतर विश्वस्त, मा. शिक्षण संचालक श्री. निलेश नलावडे, एचआर गार्गी
दत्ता, समन्वयक प्रशांत तनपुरे, महाविद्यालयाचे उपप्राचार्य प्रा. एस. पी. गायकवाड, प्राचार्या श्रीमती जया तिवारी, प्राचार्य प्रा. ए. रासकर यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आले होते.

यूपीएससी, स्पर्धा परीक्षा, अभ्यासक्रम, ॲग्री ऑप्शनल, स्पर्धा परीक्षांची तयारी, परीक्षेचे
स्वरूप, अभ्यासाची पद्धत, परीक्षांमुळे येणाऱ्या ताण-तणावाचे व्यवस्थापन आणि कृषी क्षेत्रातील
विविध करियर संधी या विषयावर त्यांनी यावेळी सविस्तर मार्गदर्शन केले. तसेच, उपस्थित
विद्यार्थ्यांनी विचारलेल्या प्रश्नांचे समाधान हि त्यांनी यावेळी केले.

यावेळी कार्यक्रमाचे सूत्रसंचालन जानवी बागल यांनी केले तर आभार कृष्णा पागीरे यांनी
केले. त्यावेळी महाविद्यालयातील विद्यार्थी तसेच प्राध्यापक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!