स्थानिक

हाजी हैदरभाई सय्यद यांचे दुःखद निधन

वयाच्या ८५ व्या वर्षी निधन 

हाजी हैदरभाई सय्यद यांचे दुःखद निधन

वयाच्या ८५ व्या वर्षी निधन

बारामती वार्तापत्र

बारामती येथील मुस्लीम समाजातील ज्येष्ठ हाजी हैदरभाई इस्माईलभाई सय्यद यांचे वयाच्या ८५ व्या वर्षी शुक्रवार (दि.11) रोजी अल्पशः आजराने राहते घरी निधन झाले. मुस्लीम बँकेचे संचालक आलताफ सय्यद यांचे वडिल तर बा.न.प.च्या माजी उपनगराध्यक्षा सौ.तरन्नुम आलताफ सय्यद यांचे सासरे होत.

हैदरभाई यांचा शांत, संयमी व मनमिळावू स्वभावाने ते सर्वांचे परिचीत होते. लहानांपासून ते थोरांपर्यंत प्रत्येकांची विचारपूस करणे खुशाली विचारणे हा गुण अंतयात्रेत सहभागी झालेले बोलून दाखवीत होते. त्यांच्या जाण्याने सर्वत्र शोककळा पसरली होती.

त्यांच्या पश्चात विवाहीत दोन मुले, एक मुलगी, नातवंडे असा परिवार आहे. त्यांच्या अंतयात्रेत सर्वस्तरातील मंडळी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Back to top button