इंदापुर मध्ये बनावट नोटाप्रकरणी दोघांना अटक
बस स्थानकावर 500 रुपयांच्या 26 नोटा हस्तगत करण्यात पोलिसांना यश

इंदापुर मध्ये बनावट नोटाप्रकरणी दोघांना अटक
बस स्थानकावर 500 रुपयांच्या 26 नोटा हस्तगत करण्यात पोलिसांना यश
इंदापूर प्रतिनिधी –
बस स्थानकावर 500 रुपयांच्या बनावट नोटा बाळगत चलनात आणण्याच्या प्रपत्य करणाऱ्या झारखंड येथील दोघांना अटक केले आहे.पोलिसांच्या सतर्कतेमुळे रात्रीच्या अंधारात पोलिसांनी पाठलाग करीत आरोपीना पकडल्याने बनावट नोटा चलनात आणण्याचा आरोपीचा प्रयान फसला आहे. यावेळी 500 रुपयांच्या 26 बनावट नोटा हस्तगत करण्यात आल्या.
याबाबत अधिक माहिती अशी की, रविवारी (दि.4) मे रोजी रात्री अकरा वाजता इंदापूर बसस्थानकावरील रिक्षा चालक संतोष मखरे यांनी पोलिसांना इंदापूर बस स्थानकावर दोन अनोखी इसम हे बनावट नोटा बाळगून त्या बदल्यात वस्तू खरेदी करीत असल्याबाबत कळविले,त्यानुरूप पोलीस निरीक्षक सूर्यकांत कोकणे,पोलिस अंमलदार अंकुश माने,योगेश गोलांडे,सौरभ पाटील,अण्णा कोळेकर,गणेश डेरे,तुषार चव्हाण,महिला पोलिस अंमलदार ज्योती विभुते,अश्विनी क्षत्रिय , काजळ शेळके यांच्या पथकाने बस स्थानकावर सापळा रचत सबंधित दोघांना ताब्यात घेत पोलीस स्थानकात आणले.
याबाबत अधिक चौकशी केली असता त्यांची नावे आसिफ सिराजुल शेख (वय 25, मूळ रा.अमानत दिआरा, पो. प्यारपुर, ता. उधवा, थाना नाधानगर, जि. साहेबगंज, राज्य झारखंड) व हलीम जब्बार सय्यद (वय 45, सध्या रा. दाना बंदर मस्जीद बंदर, मुंबई, मूळ रा. पिअरपूर, ता. नाथसागर, जि. सहेबगांज,राज्य झारखंड) अशी निष्पन्न झाली.
यावेळी पंचांसमक्ष पोलिसांनी दोघांची अंगझडती घेतली असता आसिफ सिराजुल शेख याच्याकडे 500 रुपयांच्या एकूण 26 बनावट नोटा व मोबाईल मिळून आला, तर हलीम जब्बार सय्यद याच्या झडतीमध्ये काही मिळून आले नाही. त्यानंतर या नोटांची तो बँकेचे अधिकारी व पंचांच्या समक्ष मशिनद्वारे करून नोटा बनावट असल्याची सात्री करीत वरील दोघांविरोधात बनावट नोटा बाळगल्याप्रकरणी सहाय्यक पोलीस निरीक्षक जीवन मोहिते यांच्या फिर्यादीवरून गुन्हा दाखल करण्यात आला आहे.या प्रकरणाचा अधिक तपास पोलीस निरीक्षक सूर्यकांत कोकणे यांच्या मार्गदर्शनाखाली महिला सहाय्यक पोलीस निरीक्षक स्मिता पाटील करीत आहेत.
इंदापूर शहरात बनावट नोटा बाळगणा-यांना ताब्यात घेण्यात आले असून, पुढील तपास सुरू आहे. संबंधित आरोपींनी इंदापूर बाजारपेठेमध्ये नोटा चलनात आणल्यात की नाही, याचा तपास सुरू आहे. तरी शहर व परिसरातील व्यापाऱ्यांनी अशा नोटा आढळल्यास तत्काळ इंदापूर पोलिस ठाण्याशी संपर्क साधावा.
सूर्यकांत कोकणे, पोलिस निरीक्षक, इंदापूर






