इंदापूरच्या पोलिस ठाण्यास गिल यांची भेट

शहरातील वाहतूक समस्येवर तोडगा काढण्यासाठी ठोस प्रयत्न करणार..

इंदापूरच्या पोलिस ठाण्यास गिल यांची भेट

शहरातील वाहतूक समस्येवर तोडगा काढण्यासाठी ठोस प्रयत्न करणार..

इंदापूर प्रतिनिधी –

पुणे जिल्हा ग्रामीण पोलिस अधीक्षक पदाचा पदभार स्वीकारताच पहिल्याच रविवारी (दि.18) मे दिवशी नूतन पोलिस अधीक्षक संदीपसिंग गिल यांनी इंदापूर पोलिस ठाण्यास भेट दिली व कायदा आणि सुव्यवस्थेचा आढावा घेतला त्याचबरोबर समस्याही जाणून घेत त्याबाबत उपाययोजना करण्याच्या सूचना केल्या. यामध्ये इंदापूर शहरातील वाहतूक समस्येवर तोडगा काढण्यासाठी ठोस प्रयत्न करणार असल्याची माहिती गिल यांनी दिली.

गील यांनी शहरातील कायदा व सुव्यवस्थेबाबत माहिती घेतली तसेच जगद्गुरु संतश्रेष्ठ तुकाराम महाराज पालखी सोहळ्याच्या पार्श्वभूमीवर इंदापूर तालुक्यातील मुक्काम स्थळे व मार्ग या ठिकाणची व्यवस्था याबाबतही आढावा घेतला. त्यानंतर पत्रकारांबरोबर संवाद साधताना शहर, तालुक्यातील विविध समस्या जाणून घेण्याचा प्रयत्न केला. यावेळी पुणे सोलापूर महामार्गावरील मध्यवर्ती ठिकाण म्हणून ओळख असलेल्या शहरातील जुन्या मार्गावर विविध शासकीय कार्यालये, न्यायालय, पंचायत समिती, बसस्थानक यासह शाळा व महाविद्यालय असल्याने या ठिकाणी सतत वाहतुकीची समस्या निर्माण होत असते. तसेच यामुळे अपघाताचा धोका निर्माण होऊ शकतो. याबाबतची समस्या मांडण्यात आल्यानंतर तत्काळ सिंह गिल यांनी उपविभागीय पोलिस अधिकारी डॉ सुदर्शन राठोड व पोलिस निरीक्षक सूर्यकांत कोकणे यांना या प्रश्नावर नगरपरिषदेच्या मुख्याधिकाऱ्यांबरोबर स्वतंत्र बैठक घेत उपाययोजना करण्याची सूचना केली. त्याचबरोबर कोणत्याही परिस्थितीत वाहतूक कोंडी होणार नाही यासाठी खबरदारी घेण्याबाबत सांगितले. यावेळी अप्पर पोलिस अधीक्षक गणेश बिरादार, उपविभागीय पोलिस अधिकारी डॉ. सुदर्शन राठोड, पोलिस निरीक्षक सूर्यकांत कोकणे, सहाय्यक पोलिस निरीक्षक जीवन मोहिते उपस्थित होते.

दरम्यान, तालुका पोलिस ठाण्याच्या इमारतीबाबत वरिष्ठ कार्यालयाकडे प्रस्ताव पाठवण्यात आला असून, पाठपुरावा करण्यात येईल, अशी ही माहिती पोलिस अधीक्षक संदीप सिंह गिल यांनी दिली.

Related Articles

Back to top button