व्यंकटेशनगर मध्ये रोटरी क्लब ऑफ इंदापूर कडून आर्सेनिक अल्बम 30 चे मोफत वाटप.
रोटरी क्लब ऑफ इंदापूर यांच्यावतीने.
व्यंकटेशनगर मध्ये रोटरी क्लब ऑफ इंदापूर कडून आर्सेनिक अल्बम 30 चे मोफत वाटप.
इंदापूर:- सिद्धार्थ मखरे ( तालुका प्रतिनिधी )
रोटरी क्लब ऑफ इंदापूर यांच्यावतीने व्यंकटेशनगरमध्ये होमिओपॅथिक औषध अर्सनिक अल्बम 30 चे मोफत वाटप इंदापूरच्या तहसीलदार सोनाली मेटकरी तसेच रोटरी क्लब ऑफ इंदापूर चे संस्थापक उपाध्यक्ष मुकुंद शहा, डिस्ट्रिक्ट सिनर्जी चेअरमन वसंतराव माळुंजकर, विद्यमान अध्यक्ष राकेश गानबोटे, सचिव अजिंक्य इजगुडे, मेडिकल डायरेक्टर डॉ. अतुल वनवे, सर्व्हिस प्रोजेक्ट डायरेक्टर अनिकेत वाघ, नगरसेवक जगदीश मोहिते यांच्या हस्ते 200 कुटुंबाना करण्यात आले.
जगावर आलेले संकट कोरोना व्हायरस वर वर अद्याप कोणतीही लस उपलब्ध नसल्याने केवळ रोग प्रतिकार शक्ती वाढवणे हा एकमेव प्रतिबंधात्मक उपाय आहे.
भारत सरकारच्या आयुष मंत्रालयाने कोरोना व्हायरसवर संक्रमणाच्या विरुद्ध प्रतिबंधात्मक औषध म्हणून आर्सेनिक अल्बम30 हे होमिओपॅथिक औषध सुचवण्यात आले आहे. यासाठी नागरिकांनी या गोळ्यांचे सेवन करून आपली प्रतिकारशक्ती वाढवण्यासाठी या उपक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.
यावेळी नंदकुमार गुजर, ज्ञानदेव डोंबाळे, प्रशांत भिसे, सुनील मोहिते, भीमाशंकर जाधव, उदय शहा, आसिफ बागवान, धरमचंद लोढा, नरेंद्र गांधी, बापू भोसले, वसीम बागवान उपस्थित होते.