इंदापूर तालुक्यात पुन्हा आढळला कोरोना रुग्ण…
तालुक्यातील जंक्शन भागात ३० वर्षीय पुरुषास कोरोनाची लागण..
इंदापूर तालुक्यात पुन्हा आढळला कोरोना रुग्ण…
तालुक्यातील जंक्शन भागात ३० वर्षीय पुरुषास कोरोनाची लागण..
इंदापूर:- सिद्धार्थ मखरे ( तालुका प्रतिनिधी )
इंदापूर तालुक्यात पुन्हा कोरोनाचा रुग्ण आढळून आला आहे इंदापूर तालुक्यातील जंक्शन या भागात ३० वर्षीय पुरुषास कोरोनाची लागण झाली आहे.
काही दिवसापूर्वी शहर व तालुक्यात कोरोना झपाट्याने वाढल्याने तालुक्यात एकच खळबळ उडालेली होती मात्र आरोग्य विभागाने यांच्यावरती यशस्वी उपचार केल्यानंतर यातील अकरा जन बरे झाले व त्याना घरी पाठवले आहे,
हळूहळू परिस्थिती नियंत्रणात येत असताना आज पुन्हा जंक्शन येथील एकास कोरोना ची लागण झालेली आहे
हा रुग्ण गेली एक महिन्यापासून आजारी होता याने वेगवेगळ्या भागात उपचारही घेतले आहेत सध्या या रुग्णावर मुंबई येथील टाटा कॅन्सर हॉस्पिटल मध्ये उपचार सुरु आहेत.
२१ जून रोजी हा रुग्ण मुंबई येथील टाटा रूग्णालयात कॅन्सर उपचारासाठी दाखल झाला होता. यानंतर २३ जून रोजी या रुग्णाची कोरोना चाचणी करण्यात आली. त्यानंतर काल म्हणजेच २४ जून ला या व्यक्तीचा कोरोना चाचणी अहवाल हा पॉझिटीव्ह आला, त्यामुळे त्याच्या संपर्कातील नातेवाईकांचा व इतर लोकांचा सध्या शोध सुरू आहे,
आतापर्यंत इंदापूर तालुक्यात कोरोना बाधित संख्या २१ आहे, यात १६ रुग्ण बरे झाले आहेत, २ मयत असून तिघांवर उपचार सुरू आहेत..