बारामतीतील सचिन हरिदास गवारे यांनी दाखवले माणुसकीचे दर्शन
रोख स्वरूपातील जास्तीची रक्कम प्राप्त

बारामतीतील सचिन हरिदास गवारे यांनी दाखवले माणुसकीचे दर्शन
रोख स्वरूपातील जास्तीची रक्कम प्राप्त
बारामती वार्तापत्र
विश्व माऊली ज्ञानेश्वर महाराज व श्री संत तुकाराम महाराज यांच्या शिकवणी मधूनच माणुसकीचे दर्शन होते याचा प्रत्यय पुन्हा एकदा आला.
वारकरी सेवा संघाचे बारामती शहरचे अध्यक्ष श्री सचिन हरिदास गवारे माऊली जे शहर आणि परिसरात अनेक मंदिरे, संघटना व धार्मिक कार्यक्रमां मधून सेवा कार्यात सक्रिय असतात त्यांना नजर चुकीने बारामती पोस्ट ऑफिस मधून रोख स्वरूपातील जास्तीची रक्कम प्राप्त झाली ती त्यांनी प्रामाणिकपणे स्वतः पोस्ट ऑफिस मध्ये जाऊन परत केली.
त्यांच्या प्रामाणिक पणा बद्दल त्यांचा बारामती पोस्ट ऑफिस व श्री धनंजय घोगरे साहेब यांच्यातर्फे सत्कार करून आभार व्यक्त करण्यात आले.
याचे श्रेय त्यांनी वारकरी सेवा संघ, गुरुवर्य बंडा तात्या कराडकर, आदरणीय भिडे गुरुजी, कन्हेरी व सिद्धेश्वर देवस्थान, स्वामी माधवनाथ ध्यान केंद्र,आई वडील, आजोबा आणि मामा तसेच सांप्रदायाच्या संस्काराला दिले.