स्थानिक

बारामती उपप्रादेशिक परिवहन कार्यालयाच्या आवाहन; अटकावून ठेवलेली वाहने सोडवून घेण्याची शेवटची संधी

15 दिवसात वाहने सोडवून घ्यावीत.

बारामती उपप्रादेशिक परिवहन कार्यालयाच्या आवाहन; अटकावून ठेवलेली वाहने सोडवून घेण्याची शेवटची संधी

15 दिवसात वाहने सोडवून घ्यावीत.

बारामती वार्तापत्र

बारामती उप प्रादेशिक परिवहन कार्यालयाच्या वायुवेग पथकाने थकीत कर वसुलीसाठी मोटार वाहन कायद्यातील गुन्ह्यातंर्गत कार्यालयाच्या आवारात वाहन मालक किंवा चालक यांच्या जबाबदारीवर अटकावून ठेवलेली वाहने सोडवून घ्यावीत, असे आवाहन करण्यात आले आहे.

प्रादेशिक परिवहन कार्यालयाने मोटार वाहन थकीत कराच्या वसुलीसाठी अटकावून ठेवलेल्यांपैकी 29 वाहनांच्या प्रकरणांमध्ये वाहन मालक, चालक किंवा वित्तदात्यांनी कार्यालयाशी संपर्क साधून येत्या 15 दिवसात वाहने सोडवून घ्यावीत.

या वाहनांच्या जाहीर लिलावाची प्रक्रिया 19 जून 2025 रोजी msrtcecommerce.com होणार आहे, असे आवाहन उप प्रादेशिक अधिकारी सुरेंद्र निकम यांनी केले आहे.

Back to top button