शैक्षणिक

बारामतीत सौ.लक्ष्मीबाई भाऊराव पाटील यांना जयंतीनिमित अभिवादन

कॉलेज या विद्यालयात त्यांना अभिवादन करण्यात आले.

बारामतीत सौ.लक्ष्मीबाई भाऊराव पाटील यांना जयंतीनिमित अभिवादन

कॉलेज या विद्यालयात त्यांना अभिवादन करण्यात आले.

बारामती वार्तापत्र

रयत शिक्षण संस्थेची स्थापना करणाऱ्या डॉ.कर्मवीर भाऊराव पाटील यांच्या अर्धांगिनी रयत माऊली सौ.लक्ष्मीबाई भाऊराव पाटील यांच्या जयंतीनिमित बारामतीतील राधेश्याम एन आगरवाल टेक्निकल इन्स्टिट्यूट व ज्युनिअर कॉलेज या विद्यालयात त्यांना अभिवादन करण्यात आले.

प्रसंगी प्रतिमेचे पूजन प्राचार्य श्री भगवान भिसे,पर्यवेक्षिका सौ.अलका. चौधर,उपशिक्षक श्री सावता म्हस्के,श्री निंभोरे,सौ. म्हस्के उपस्थित होते.

यावेळी मा.प्राचार्य भिसे यांनी लक्ष्मीबाई भाऊराव पाटील यांच्या कार्याचे वर्णन करत वसतिगृहातील विद्यार्थ्यांसाठी अंगावरील सर्व दागिने मोडल्याची घटना सांगून दातृत्वाची महती स्पष्ट केली.

यावेळी कार्यक्रमाचे आभार श्री सावता म्हस्के यांनी मांडले.

Back to top button