टेक्निकल मध्ये 1500 विद्यार्थ्यांनी केली योगाची प्रात्यक्षिके
“एक पृथ्वी, एक आरोग्यासाठी योग”

टेक्निकल मध्ये 1500 विद्यार्थ्यांनी केली योगाची प्रात्यक्षिके
“एक पृथ्वी, एक आरोग्यासाठी योग”
बारामती वार्तापत्र
बारामती येथील राधेश्याम एन अग्रवाल टेक्निकल इन्स्टिट्यूट व जुनिअर कॉलेज या ठिकाणी आंतरराष्ट्रीय योग दिन उत्साहात साजरा करण्यात आला यावेळी इयत्ता पाचवी ते बारावी तसेच व्यवसाय अभ्यासक्रम असे मिळून एकूण जवळपास दीड हजार विद्यार्थ्यांनी योगाची प्रात्यक्षिके केली.
यावेळी विद्यालयातील सर्व शिक्षक शिक्षिका व शिक्षकेतर कर्मचारी यांनीही योगाची प्रात्यक्षिके केली. प्रारंभी विद्यालयाचे प्राचार्य श्री भगवान भिसे यांनी धकाधकीच्या जीवनात आरोग्य आणि व्यायाम व तसेच यासाठी योगाचे महत्त्व प्रतिपादन करीत सर्व विद्यार्थ्यांनी नियमित योगासन करण्याचे आवाहन केले.
यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून हे श्री रामलिंग तांबे,डॉ.सुप्रिया जोशी,सौ.रुपाली केकान,सौ.अर्चना कदम, कु .अनुजा केकान , कु .श्रद्धा घाडी ,प्रा.विठ्ठल चौगुले उपस्थित होते. तर नम्रता भापकर,वैष्णव मोरे,ईश्वर घाडगे यांनीविद्यार्थ्यांना योगाची प्रात्यक्षिके करून दाखवली व विद्यार्थ्यांनाही ती करण्यास प्रोत्साहित केले. यावेळी प्राचार्य श्री भगवान भिसे,उपमुख्याध्यापक श्री पाचपुते सर व पर्यवेक्षिका सौ. अलका चौधर यांनी गुलाब पुष्प देऊन त्यांचे स्वागत केले.
आंतरराष्ट्रीय योग दिवस 2025 हा एक महत्त्वाचा टप्पा आहे, या जागतिक उत्सवाचा 11 वा वर्धापनदिन आहे. “एक पृथ्वी, एक आरोग्यासाठी योग” या थीम अंतर्गत या वर्षीचा योगदान साजरा होत आहे.सर्वांगीण कल्याण आणि पर्यावरणीय सुसंवाद वाढविण्यात योगाची महत्त्वपूर्ण भूमिका अधोरेखित करते.कार्यक्रमाचे प्रास्ताविक सौ.संपदा आगवणे,आभार श्री अरविंद मोहिते तर सूत्रसंचालन श्री निलेश गायकवाड यांनी केले.