शैक्षणिक

मजुराची मुलगी शरद पवारांच्या मदतीमुळे शिक्षणासाठी अमेरिकेच्या दिशेने झेप 

जिद्द असेल, तर सामान्य कुटुंबातील मुलेही किती पुढे जाऊ शकतात, याचे हे प्रेरणादायी उदाहरण आहे

मजुराची मुलगी शरद पवारांच्या मदतीमुळे शिक्षणासाठी अमेरिकेच्या दिशेने झेप 

जिद्द असेल, तर सामान्य कुटुंबातील मुलेही किती पुढे जाऊ शकतात, याचे हे प्रेरणादायी उदाहरण आहे

बारामती वार्तापत्र 

वर्गमित्राची नात शिक्षणात हुशार आहे, परंतु तिच्या वडिलांची परिस्थिती बेताची आहे, हे माहिती झाल्यानंतर ज्येष्ठ नेते शरद पवार यांनी या मुलीला अमेरिकेतील शिक्षणासाठी भरीव मदत केली.

शुक्रवारी (दि. 20) बारामतीत आयोजित पत्रकार परिषदेत एआयच्या उच्च शिक्षणासाठी अमेरिकेत निघालेल्या या मुलीची पवार यांनी पत्रकारांशी ओळख करून देत तिच्या कर्तृत्वाचे कौतुक केले.

आल्फिया जावेद तांबोळी (रा. माळेगाव, ता. बारामती) असे या मुलीचे नाव आहे. तिचे आजोबा पवार यांचे कधी काळी वर्गमित्र होते. अल्फियाच्या घरची परिस्थिती तशी बेताचीच आहे. तिचे वडील रोजंदारीवर काम करतात. महिना दहा हजार रुपयांपेक्षा अधिक त्यांची कमाई नाही. आल्फिया मात्र सुरुवातीपासूनच शिक्षणात हुशार होती.

दहावीलाही तिने चांगले गुण मिळविले होते. गुणवत्तेत ती नेहमीच सरस असल्याने आठवी ते बारावीपर्यंत तिला पवार यांच्यामुळेच शिष्यवृत्ती मिळाली होती. बारावीला ती पहिल्या तीन विद्यार्थ्यांमध्ये आली होती. एआय इंजिनिअरिंगसाठी विद्या प्रतिष्ठानला प्रवेश घेताना तिला उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी मदत केली होती.

आता ती एआय विषयासंबंधी उच्च शिक्षणासाठी अमेरिकेत जाता आहे. त्यासाठी तिला मोठ्या प्रमाणात खर्च येणार होता. तिने फक्त पहिल्या सत्रासाठी काही मदत मिळावी यासाठी पवार यांना पत्र दिले होते, परंतु पवार यांनी तिची सगळी माहिती घेत तिला पहिल्याच वर्षी दहा लाखांची मदत केली.

या वेळी पवार म्हणाले, एआय ही शिक्षणाची नवीन संधी आहे. आपण इथे शिक्षणाची संधी उपलब्ध करून दिली. त्यामुळे माळेगावच्या आल्फिया या मुलीने संधीचे सोने केले. ती आता अमेरिकेच्या दिशेने झेप घेत आहे. तिचे वडील रोजंदारीवर कामाला जातात. जिद्द आणि अभ्यासाच्या बळावर ही मुलगी अमेरिकेतील विद्यापीठात एआयच्या ममास्टर्सफ उच्च शिक्षणासाठी निघाली आहे. या मुलीचे शिक्षण शारदानगर आणि विद्या प्रतिष्ठानमध्ये झाले आहे. या दोन्ही संस्था उभ्या केल्याचे समाधान असल्याचे त्यांनी सांगतिले.

माध्यमांशी बोलताना आल्फिया म्हणाली, माझ्या आजोबांचे शरद पवार हे वर्गमित्र असल्याने त्यांच्याशी आमच्या कुटुंबाची ओळख आहे. आजवर मला शिष्यवृत्तीच्या माध्यमातून मदत झाली. माझे वडील रोजंदारीवर कामाला जातात, आई शिवणकाम, पार्लरचे काम करते. उच्चशिक्षणासाठी अमेरिकेला जाण्यासाठी शरद पवार यांनी मोलाची मदत केली. अमेरिकेत भारतीय प्राध्यापकांच्या मार्गदर्शनाखाली एआयवर संशोधन करण्याचा मानस तिने व्यक्त केला.

Related Articles

Back to top button