उद्या अजितदादा यांच्या उपस्थितीत माळेगाव निवडणुकीचा विजय व आभार मेळावा
कारखान्याच्या प्रगतीबद्दल आणि विरोधकांवर काय बोलतात याबाबत उत्सुकता निर्माण झाली आहे.

उद्या अजितदादा यांच्या उपस्थितीत माळेगाव निवडणुकीचा विजय व आभार मेळावा
कारखान्याच्या प्रगतीबद्दल आणि विरोधकांवर काय बोलतात याबाबत उत्सुकता निर्माण झाली आहे.
बारामती वार्तापत्र
आपण राज्याचे उपमुख्यमंत्री आहोत, हे बाजूला ठेवत तब्बल आठवडाभर बारामतीत थांबून एक उमेदवार व पॅनेलप्रमुख या नात्याने वाडीवस्तीवर जात प्रचार करत नाराजी दूर करून माळेगाव कारखान्याची सत्ता अजित पवार यांनी अक्षरशः खेचून आणली. निवडणूक जिंकण्यासाठी जे काही करावे लागते ते सर्व करत आपण मुत्सद्दी आहोत, सभासददेखील पाठीशी आहेत, हेच त्यांनी सिद्ध करून दाखविले.
‘मी जे बोलतो ते करून दाखवतो,’ असे वारंवार भाषणात त्यांनी नमूद केले होते. त्यानुसार एक हाती निवडणूक लढवून दिग्गज समजल्या जाणाऱ्या चंद्रराव तावरे व रंजनकुमार तावरे यांच्या पॅनेलला त्यांनी पराभवाची धूळ चारली. बारामतीत आजही त्यांचाच शब्द प्रमाण आहे, मतदारसंघातील संस्थांवर त्यांची मजबूत पकड आहे, हे यानिमित्ताने पुढे आले. या विजयानंतर सलग दुसऱ्यांदा अजित पवार यांचेच माळेगाव कारखान्यावर वर्चस्व असेल.
निवडणुकात सभासदाना निळकठश्वर पनलच्या उमदवाराना प्रचंड मताना निवडून देत तावरे यांच्या पॅनेलला त्यांनी पराभवाची धूळ चारली. या पार्श्वभूमीवर उद्या शनिवार दि. २८ जून रोजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या उपस्थितीत आभार मेळावा आयोजित करण्यात आला आहे. या मेळाव्यात अजितदादा कारखान्याच्या प्रगतीबद्दल आणि विरोधकांवर काय बोलतात याबाबत उत्सुकता निर्माण झाली आहे.
माळेगाव कारखान्याच्या निवडणुकीत अजितदादांच्या नेतृत्वाखालील निळकंठेश्वर पॅनलला एकतर्फी विजय मिळाला आहे. २१ पैकी २० जागांवर निळकंठेश्वर पॅनलने विजय मिळवत विरोधकांना नामोहरम केले. या पार्श्वभूमीवर उद्या शनिवार दि. २८ जून रोजी दुपारी १.३० वाजता अजितदादांच्या प्रमुख उपस्थितीत माळेगाव कारखान्याच्या कार्यस्थळी शिवतीर्थ मंगल कार्यालयात आभार मेळावा आयोजित करण्यात आला आहे.
सभासदांनी या निवडणुकीत अजितदादांच्या नेतृत्वावरील विश्वास व्यक्त करत निळकंठेश्वर पॅनलला भरघोस मतदान करत विरोधकांना चपराक दिली. राज्यात चर्चेची ठरलेली निवडणूक अजितदादांना ऐतिहासिक विजय देणारी ठरली. त्यानंतर आता अजितदादा माळेगावच्या सभासदांचे आभार मानण्यासाठी येत आहेत. उद्या माळेगावमध्ये होणाऱ्या या सभेत अजितदादा माळेगाव कारखान्याच्या प्रगतीबद्दल तर बोलतीलच, मात्र विरोधकांनाही जोरदार प्रत्युत्तर देतील. मुळं उद्याच्या मेळाव्याकडे सर्वांचंच लक्ष लागलं आहे