राजकीय

बारामती नगरपरिषद निवडणुकांबद्दलची सर्वात मोठी बातमी, १३ पक्ष, संघटना एकवटले

निपक्षपाती प्रभाग रचनेसाठी मुंबईत अधिकाऱ्यांना साकडे बारामती 

बारामती नगरपरिषद निवडणुकांबद्दलची सर्वात मोठी बातमी, १३ पक्ष, संघटना एकवटले

निपक्षपाती प्रभाग रचनेसाठी मुंबईत अधिकाऱ्यांना साकडे बारामती

बारामती वार्तापत्र 

निपक्षपातीपणे प्रभाग रचना व्हावी, यासाठी भाजप सह १३ पक्ष संघटनांनी निवडणूक निर्णय अधिकारी यांची मुंबई येथे भेट घेतली.

याबाबत निवडणूक निर्णय अधिकारी यांना निवेदन देण्यात आले.

मुंबई येथे राज्याचे निवडणूक निर्णय अधिकारी वाघमारे यांना खासदार सुप्रिया सुळे यांच्यासोबत बारामती नगरपालिकेच्या हद्दीतील भाजपांसहित १३ विविध पक्ष्यांचे पदाधिकाऱ्यांनी निवडणूक निर्णय अधिकारी यांची भेट घेत मागील वेळेस प्रभाग रचनेत झालेल्या चुका निदर्शनास आणून दिल्या.प्रभाग रचना करताना होत असलेल्या दोन प्रभागामध्ये दहा टक्क्यांपेक्षा जास्त जनगणना नसावी.

मागील वेळी बारामतीमध्ये एका प्रभागाची मतदार संख्या आठ हजार व शेजारच्या प्रभागाची मतदार संख्या दोन हजार एकशे पन्नास अशा पद्धतीने जाणूनबुजून प्रभाग रचना केलेले निदर्शनास आलेले आहे. निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांच्या मार्गदर्शक सूचनान्वये मार्गदर्शक सूचनांच्या नुसार शक्यतो नदी ओलांडू नये, कॅनॉल ओलांडू नये, अशी मागणी केली आहे. मागासवर्गीय समाजाच्या लोकसंख्येचे विभाजन करू नये अल्पसंख्याक समाजाच्या वस्तीचे विभाजन करण्यात येऊ नये, याबाबतीत कोणतेही निकष मागच्या सलग दोन निवडणुकांमध्ये पाळले गेलेले नाहीत.

सर्व बाबी मुख्य निवडणूक आयुक्तांच्या निदर्शनास आणून देण्यात आलेले आहेत. प्रभाग करताना योग्य त्या सूचनांचे पालन करून काटेकोर पद्धतीने कोणावरही पक्षपात होणार नाही. त्यामध्ये कोणत्याही राजकीय व्यक्तीचा हस्तक्षेप नसेल, अशा पद्धतीने कामकाज व्हावे, असे पत्र ज्येष्ठ नेते शरद पवार तसेच खासदार सुप्रिया सुळे यांनी देखील दिले आहे. याप्रसंगी सुनील सस्ते, आरती शेंडगे, वीरधवल गाडे, ॲड. निलेश वाबळे, उमेश पवार, बलभीम जाधव, प्रीतम तपकीरे उपस्थित होते.

Related Articles

Back to top button