स्थानिक

बारामती तालुक्यातील पिंपळीत संत सोपानकाका महाराज पालखी सोहळ्यास मेंढ्यांचे रिंगण

मेंढ्यांचे रिंगण अलोबनीय डोळ्यांचे पारणे फेडणारे असे होते.

बारामती तालुक्यातील पिंपळीत संत सोपानकाका महाराज पालखी सोहळ्यास मेंढ्यांचे रिंगण

मेंढ्यांचे रिंगण अलोबनीय डोळ्यांचे पारणे फेडणारे असे होते.

बारामती वार्तापत्र 

पिंपळी येथे दरवर्षी संत सोपानकाका महाराज पालखी सोहळ्याचे आगमन मारुती मंदिर या ठिकाणी होत असते.

पिंपळीमध्ये बाळूमामा उत्सवानंतर अन्य कोणताही धार्मिक कार्यक्रम होत नसल्याने या सोहळ्यास अनन्यसाधारण असे महत्व पिंपळी येथील नागरिकांच्या दृष्टीने आहे.

पिंपळी गावात सोहळ्याचे आगमन होताच पालखी बैलजोडी रथाचे आश्वाचे आणि चोफदार महाराज यांचे स्वागत पिंपळी लिमटेक गावच्या सरपंच स्वाती अशोकराव ढवाण व मा.सरपंच मंगल हरिभाऊ केसकर आणि मा.उपसरपंच अश्विनी सुनिल बनसोडे यांच्या हस्ते औक्षण करून करण्यात आले.

त्यानंतर काही अंतरावरती मेंढ्यांचे भव्य गोल रिंगण साकारण्यात आले हे मेंढ्यांचे रिंगण अलोबनीय डोळ्यांचे पारणे फेडणारे असे होते.
पालखी रथास मेंढ्यांचे रिंगण गावातील मेंढपाळ शेतकरी आप्पा केसकर, रमेश केसकर अर्जुन केसकर,यशवंत केसकर, तानाजी केसकर,कुंडलिक केसकर,आबासो केसकर, जयवंत केसकर आदी मेंढपाळांच्या मेंढ्यांनी गोल रिंगण करून स्वागत करण्यात आले.

पालखी सोहळ्यास वारकरी संप्रदायाच्या सूचनेनुसार पिठलं भाकरी, वांगे मसाला,भात लोणचे या मेनूचे जेवण दिले जाते त्याचा आस्वाद घेऊन पुढे पालखी सोहळा पंढरपूरकडे काटेवाडी बारामती इंदापूर रस्त्याने प्रस्थानतरीत झाला.
पालखी सोहळा पिंपळी येथील मारुती मंदिरात विसावल्यानंतर गावातील संपूर्ण वातावरण भक्तीमय झाले होते.पालखी सोहळ्यास ग्रामस्थांनी शाश्रू नयनांनी निरोप दिला.

पालखी सोहळा प्रमुखांचे आभार संचालक संतोषराव ढवाण पाटील यांनी मानले.

पालखी सोहळ्याचे स्वागत
सरपंच स्वाती ढवाण पाटील,मा.सरपंच मंगल केसकर,मा.उपसरपंच अश्विनी बनसोडे आदींच्या हस्ते करण्यात आले. याप्रसंगी छत्रपती सहकारी साखर कारखाना संचालक सतीशराव देवकाते,छत्रपती सहकारी साखर कारखाना मा.संचालक संतोषराव ढवाण,बारामती खरेदी विक्री संघाचे व्हा.चेअरमन नितीन देवकाते, बारामती तालुका खरेदी विक्री संघाचे व्हा.चेअरमन भाऊसाहेब भिसे,उपसरपंच अजित थोरात, राष्ट्रवादी काँग्रेस महाराष्ट्र प्रदेश सोशल मिडियाचे उपाध्यक्ष सुनिल बनसोडे, शिवसेना जिल्हा उपाध्यक्ष देवेंद्र बनकर,श्रीराम सोसायटीचे संचालक अशोकराव ढवाण,बारामती फलोत्पादन संघाचे संचालक रघुनाथ देवकाते पाटील,मा.सरपंच राजेंद्र केसकर, मा.उपसरपंच आबासाहेब देवकाते,ग्रामपंचायत सदस्य राहुल बनकर, वैभव पवार, उमेश पिसाळ, सदस्या मंगल खिलारे,मिनाक्षी देवकाते, निर्मला यादव,पिंपळी लिमटेक विविध विकास सोसायटीचे चेअरमन दादासाहेब केसकर,भाजपा युवा मोर्चेचे उपाध्यक्ष संदीप केसकर,हरिभाऊ केसकर,बापूराव खोमणे,पिंपळी लिमटेक विविध विकास सोसायटीचे मा.चेअरमन अशोकराव देवकाते, मा.सरपंच रमेश देवकाते,विकास बाबर,उत्तमराव मदने,वकील कल्याण राजगुरू,बापूराव केसकर, तळशीदास केसकर,मारुती बाबर, पद्मकांत निकम,हनुमंतराव तांबे,हनुमंत देवकाते,रणजित देवकाते, रामदास यादव, भानुदास बाबर,नवनाथ देवकाते, रमेश देवकाते,दिपक देवकाते आदींसह ज्येष्ठ नागरिक, युवक,महिला ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Related Articles

Back to top button