इंदापूर

जेष्ठ सामाजिक कार्यकर्ते संजय गीते महाराष्ट्र रत्न पुरस्काराने सन्मानित

भारती १- २ भाग

जेष्ठ सामाजिक कार्यकर्ते संजय गीते महाराष्ट्र रत्न पुरस्काराने सन्मानित

भारती १- २ भाग

इंदापूर; प्रतिनिधी

रुपीनगर ( ता. मुळशी जि. पुणे ) येथील ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते संजय सिताराम गीते यांचा विविध क्षेत्रातील समाजसेवी कार्याबद्दल महाराष्ट्र रत्न पुरस्काराने सन्मान करण्यात आला.

आनंदी युनिव्हर्स फाऊंडेशन च्या वतीने पुणे शिवाजीनगर घोले रोड वरील पंडित जवाहरलाल नेहरू सभागृहात संजय गीते यांना अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळाचे अध्यक्ष मेघराज राजे भोसले तसेच मराठी चित्रपट सृष्टीतील लोकप्रिय अभिनेत्री निशिगंधा कुंटे यांच्या हस्ते सन्मानचिन्ह तसेच सन्मानपत्र देऊन गौरविण्यात आले.

यावेळी मेघराज राजे भोसले म्हणाले, संजय गीते हे महाराष्ट्रातील कर्तुत्ववान व्यक्तीमत्व असून त्यांना महाराष्ट्र रत्न पुरस्काराने सन्मानित करताना मला मोठा आनंद झाला आहे. त्यांच्या कार्याचा मला सार्थ अभिमान आहे.

रुपीनगर ( ता. हवेली जि. पुणे ) येथील भूमिपुत्र संजय सिताराम गीते यांचे साहित्य, संगीत, योग प्राणायाम, भारतीय आयुर्वेद प्रसारामध्ये मोठे योगदान आहे. ते लेखक, कवी, पौराणिक कथाकार असून त्यांची अमृत कथा काव्य भारती १- २ भाग, शिवार काव्यसंग्रह सांज- सकाळी व रानफूल इत्यादी पुस्तके प्रकाशित झाली आहेत.

संगीत राम कथा, भागवत कथा, हरिनाम सप्ताह तसेच इतर सर्व क्षेत्रातील समाजकार्य लक्षात घेऊन त्यांना सन्मानित करण्यात आल्याचे प्रतिपादन आनंदी युनिव्हर्स फाऊंडेशनचे अध्यक्ष गणेश रामदास विटकर यांनी केले.

सत्कारमूर्ती संजय गीते म्हणाले, महाराष्ट्र रत्न पुरस्कार मिळाल्याने माझ्या धार्मिक, सांगीतिक, सामाजिक, सांस्कृतिक, यौगिक, आयुर्वेद प्रचार कार्यास प्रोत्साहन मिळाले असून त्यामुळे माझी आणखी जबाबदारी वाढली आहे.

सर्व क्षेत्रात योगदान देण्यासाठी आपण कटिबद्ध आहे.

Related Articles

Back to top button