बारामतीत आजपासून नोंदणी होणाऱ्या वाहनांच्या मोटार वाहन करात सुधारणा
नागरिकांनी नवीन बदलाची नोंद घ्यावी

बारामतीत आजपासून नोंदणी होणाऱ्या वाहनांच्या मोटार वाहन करात सुधारणा
नागरिकांनी नवीन बदलाची नोंद घ्यावी
बारामती वार्तापत्र
महाराष्ट्र मोटार वाहन कर (सुधारणा) अधिनियम २०२५ तील तरतूदीनुसार आजपासून नव्याने नोंदणी होणाऱ्या वाहनांच्या मोटार वाहन करात सुधारणा करण्यात आली असून नागरिकांनी नवीन बदलाची नोंद घ्यावी, असे आवाहन उपप्रादेशिक परिवहन अधिकारी सुरेंद्र निकम यांनी केले आहे.
यामध्ये सीएनजी, एलपीजीवर चालणारी दुचाकी व चारचाकी वाहनाच्या गटात १० लाख रुपयापर्यंतच्या वाहनाच्या किंमतीवर ८ टक्के, १० ते २० लाखापर्यंतच्या वाहनांच्या किंमतीवर ९ टक्के, २० लाखाच्यावरील वाहनांच्या किंमतीवर १० टक्के कर आकारण्यात येणार आहे.
खोदणारी, बांधकाम उपकरण वाहने (क्रेन, क्रॉम्रेा सर, प्राजेक्टर्स, एक्सकेव्हेटर्स आदी) तसेच ७ हजार ५०० कि.ग्रॅ. वजनापर्यंतच्या हलक्या मालवाहू वाहनाच्या किंमतीच्या ७ टक्के वाहन कर नोंदणीवेळी एकरकमी भरावा लागणार आहे, अशी माहितीदेखील श्री. निकम यांनी प्रसिद्धी पत्रकान्वये दिली आहे.