ना काका , ना पुतण्या ..जोरदार धक्का; फडणवीसांचा मास्टरस्ट्रोक! प्रवीण माने भाजपमध्ये
महाराष्ट्राच्या राजकारणात बारामतीचा धूर कधीच थांबत नाही

ना काका , ना पुतण्या ..जोरदार धक्का; फडणवीसांचा मास्टरस्ट्रोक! प्रवीण माने भाजपमध्ये
महाराष्ट्राच्या राजकारणात बारामतीचा धूर कधीच थांबत नाही
इंदापूर;प्रतिनिधि
इंदापूर तालुक्यातील पुणे जिल्हा परिषदेचे माजी सभापती प्रवीण माने यांनी आज भाजप प्रदेश अध्यक्ष रविंद्र चव्हाण यांच्या उपस्थितीत पक्ष प्रवेश केला.तर या पक्ष प्रवेशामागे दौंडचे भाजपचे आमदार राहुल कूल असल्याची चर्चा आहे.यापुर्वी भोरचे माजी आमदार संग्राम थोपटे,धुळ्याचे माजी आमदार कुणाल पाटील आणि आता पुणे जिल्हा परिषदेचे माजी सभापती प्रवीण माने या तिघांचा दौंडचे भाजपचे आमदार राहुल कुल यांनी पक्ष प्रवेश घडवुन आणल्याची चर्चा आहे.त्यामुळे आता आगामी कालावधीत कोणत्या नेत्यांचा राहुल कूल पक्ष प्रवेश घडवुन आणतात, याकडे सर्वांचे लक्ष लागून राहिले आहे.
विधानसभा निवडणुकी दरम्यान पुणे जिल्ह्यातील इंदापूर विधानसभा निवडणुकीत अजित पवार गटाचे दत्तात्रय भरणे आणि शरद पवार गटाचे हर्षवर्धन पाटील यांच्या लढतीमुळे खर्या अर्थाने विशेष चर्चेत राहिली होती.त्या निवडणुकीत दत्तात्रय भरणे हे विजयी झाले.तर प्रवीण माने यांनी अपक्ष निवडणुक लढवित, 38 हजार 500 मते घेऊन इंदापूरमध्ये वैयक्तीक ताकद दाखवून दिली.
प्रवीण माने यांनी अपक्ष निवडणुक लढवल्यामुळे हर्षवर्धन पाटील यांना सर्वाधिक फटका बसल्याचे,त्यावेळी राजकीय वर्तुळात चर्चा रंगली होती.त्या निवडणुकीनंतर प्रवीण माने हे कोणत्या पक्षामध्ये जाणार या चर्चा सुरू झाल्या.त्याच दरम्यान भाजपचे आमदार राहुल कूल यांच्याशी वाढलेली मैत्रीमुळे येत्या काळात होणार्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका लक्षात घेऊन प्रवीण माने हे लवकरच भाजपात जातील,अशी शक्यता वर्तविली जात होती.मात्र केव्हा भाजपात जाणार याकडे सर्वच राजकीय मंडळीचे लक्ष लागून राहिले होते.अखेर आज प्रवीण माने यांनी भाजप प्रदेश अध्यक्ष रविंद्र चव्हाण यांच्या उपस्थितीत भाजपात प्रवेश केला.
प्रवीण माने यांनी भाजपमध्ये प्रवेश केल्याने इंदापूर आणि बारामती लोकसभा क्षेत्रात भाजपची ताकद वाढणार आहे.या सर्व प्रवेशामागे राहुल कुल हे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे निकटवर्तीय आणि पुणे जिल्ह्यातील भाजपचे महत्त्वाचे स्थानिक रणनीतीकार म्हणून काम करत असल्याचे मानले जाते. देवेंद्र फडणवीस यांनीही सार्वजनिक सभेत राहुल कुल यांच्या कामाचे कौतुक केले.त्यावेळी राहुल कूल यांना मंत्रिपद देण्याचे संकेत दिले होते.त्यामुळे या नेत्यांच्या भाजप प्रवेशामागे राहुल कुल यांची भूमिका महत्त्वाची असल्याचे स्थानिक राजकीय वर्तुळात बोलले जात आहे.
त्यामुळे राज्यातील भारतीय जनता पार्टीचे वरिष्ठ नेत्यांसह केंद्रीय नेतृत्वाने देखील राहुल कुल यांची दखल घेतली असून भारतीय जनता पार्टीमध्ये आमदार राहुल यांना लवकरच मोठी जबाबदारी मिळण्याचे संकेत मिळत असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात चर्चा रंगू लागली.