बारामतीत संताप;वाढदिवसाचं गिफ्ट देण्याच्या बहाण्याने बोलावलं;अल्पवयीन मुलीवर अत्याचार
कोणाला सांगितलं तर वाट्टोळं करेन, धमकी दिली अन्

बारामतीत संताप;वाढदिवसाचं गिफ्ट देण्याच्या बहाण्याने बोलावलं;अल्पवयीन मुलीवर अत्याचार
कोणाला सांगितलं तर वाट्टोळं करेन, धमकी दिली अन्
बारामती वार्तापत्र
वाढदिवसाला गिफ्ट द्यायचे आहे, असं सांगून एका अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार झाल्याची संतापजनक घटना बारामतीत घडल्याचं समोर आलं आहे. बारामती तालुक्यातील वाघळवाडी येथील कन्नडवस्ती परिसरात ही घटना घडल्याची माहिती आहे.
याप्रकरणी आरोपी विरोधात बाललैंगिक अत्याचाराचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याप्रकरणातील आरोपी दादा ऊर्फ ऋतिक वायकर (रा. करंजेपुल) आणि बाळा ऊर्फ दयानंद होळकर (रा. होळ) यांच्या विरोधात वडगाव निंबाळकर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
वाढदिवसाचं गिफ्ट देण्याच्या बहाण्याने बोलावलं
आरोपी दादा उर्फ ऋतिक वायकर याने पीडितेच्या वाढदिवशी तिला बहाण्याने बोलावलं. तुला वाढदिवसाचे गिफ्ट द्यायचे आहे, तू लोखंडी पुलाचे पलीकडे ये, असं सांगून त्यांनी या अल्पवयीन मुलीला बोलावून घेतलं. अल्पवयीन मुलीला आरोपीच्या हेतूंची काहीही माहिती नव्हती. त्यामुळे ती अंधारात लोखंडी पुलाचे पलीकडे गेली.
त्यानंतर ऋतिक वायकरने वाढदिवसाच्या दिवशी जीवे मारण्याची धमकी देत बळजबरीने लैंगिक अत्याचार केले. तसेच, आरोपी बाळा उर्फ दयानंद होळकर याने पीडिता घरी एकटी असताना जबरदस्तीने तोंड दाबून तिच्याशी जबरदस्तीने शरीरिक संबंध प्रस्थापित केले. तसेच, या घटनेची वाच्यता केल्यास भावाला जिवंत सोडणार नाही, अशी धमकीही तिला दिली.
तसेच, 1 जून रोजी दुपारच्या सुमारास ऋतिक वायकर याने जबरदस्तीने त्याचा मित्र सनी यादव याच्या वाघळवाडी येथील घरात कोणी नसताना जबरदस्तीने अत्याचार केले. हा प्रकार कोणाला सांगितला तर, तुझं वाट्टोळं करेन, तुझं लग्न होवू देणार नाही. जर, पोलिसांना याबाबत काहीही सांगितले तर घरातील एकालाही जिवंत सोडणार नाही, अशी धमकीही दिली. या घटनेने परिसरात एकच खळबळ माजली आहे. पोलिसांत तक्रार दिल्यानंतर दोन्ही आरोपींविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी पुढील तपास उपविभागीय पोलीस अधिकारी डॉ. सुदर्शन राठोड करीत आहे. या घटनेनंतर परिसरातील नागरिकांमधून संताप व्यक्त केला जात आहे.