सायबर सुरक्षेसाठी महत्त्वपूर्ण पाऊल! विद्या प्रतिष्ठान कला, विज्ञान व वाणिज्य महाविद्यालय आणि क्विक हील फाउंडेशन यांच्यात सामंजस्य करार संपन्न
कराराचा उद्देश विद्यार्थ्यांमध्ये सायबर सुरक्षा

सायबर सुरक्षेसाठी महत्त्वपूर्ण पाऊल! विद्या प्रतिष्ठान कला, विज्ञान व वाणिज्य महाविद्यालय आणि क्विक हील फाउंडेशन यांच्यात सामंजस्य करार संपन्न
कराराचा उद्देश विद्यार्थ्यांमध्ये सायबर सुरक्षा
बारामती वार्तापत्र
विद्या प्रतिष्ठानच्या कला, विज्ञान व वाणिज्य महाविद्यालय, बारामती आणि क्विक हील फाउंडेशन यांच्यात सायबर सुरक्षेसंदर्भात जनजागृती व प्रशिक्षणासाठी एक महत्त्वपूर्ण सामंजस्य करार नुकताच करण्यात आला.
या कराराचा उद्देश विद्यार्थ्यांमध्ये सायबर सुरक्षा, डिजिटल सजगता आणि सुरक्षित ऑनलाइन वर्तन याबाबत जागरूकता निर्माण करणे, तसेच प्रशिक्षण कार्यशाळा, स्पर्धा, शिबिरे व विविध उपक्रमांचे आयोजन करणे हा आहे.
कार्यक्रमाला क्विक हील फाउंडेशन च्या अध्यक्षा सौ. अनुपमा काटकर, सहयोगी संचालक श्री. अजय शिर्के, महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. भरत शिंदे, उपप्राचार्य डॉ. शामराव घाडगे, विभाग प्रमुख प्रा. महेश पवार, तसेच समन्वयक प्रा. अक्षय भोसले, इतर सर्व सहकारी प्राध्यापक आणि अनेक विद्यार्थी उपस्थित होते.
यावेळी बोलताना प्राचार्य डॉ. भरत शिंदे सर म्हणाले,
“सायबर सुरक्षेच्या वाढत्या धोक्याच्या पार्श्वभूमीवर अशी भागीदारी ही काळाची गरज आहे. विद्यार्थ्यांना सुरक्षित डिजिटल भविष्य घडवण्यासाठी हे प्रशिक्षण अत्यंत उपयुक्त ठरेल.”
क्विक हील फाउंडेशन च्या वतीने श्री. अजय शिर्के यांनी सांगितले की,
“विद्यार्थ्यांमध्ये सायबर सजगता निर्माण करणे हे आमचे मुख्य ध्येय असून, अशा शैक्षणिक संस्थांशी भागीदारी करून आम्ही ते साकार करत आहोत.”