माळेगाव बु

असं पहिल्यांदाच घडतंय; दि माळेगाव कारखान्याच्या चेअरमनपदी अजित पवार यांची नियुक्ती बेकायदेशीर- चंद्रराव तावरे

निवडणूक अधिकारी म्हणाले, आता वेळ संपली

असं पहिल्यांदाच घडतंय; दि माळेगाव कारखान्याच्या चेअरमनपदी अजित पवार यांची नियुक्ती बेकायदेशीर- चंद्रराव तावरे

निवडणूक अधिकारी म्हणाले, आता वेळ संपली

बारामती वार्तापत्र 

बहुचर्चित माळेगाव सहकारी साखर कारखान्यापदी धुरा कोणाच्या हाती देण्यात आली हे स्पष्ट झालं आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार यांची बिनविरोध निवड करण्यात आली आहे.

या विजयामुळे राज्यातील सहकारी राजकारणात त्यांचा पुन्हा एकदा कमबॅक झाला आहे. अजित पवार यांचं ब वर्ग संस्था मतदार संघातून 101 पैकी 91 मतांनी निवड झाली आहे. अजित पवार यांना प्रशासनाबरोबर सहकारी क्षेत्राचा 35 वर्षांचा अनुभव असून उपाध्यक्षपदाची जबाबदारी संगीता कोकरे यांना देण्यात आली आहे.

कोकरे या नीरावागज गटातून 8 हजार चारशे चाळीत मतांनी निवडूण आल्या आहेत. संगीत कोकरे यांनी माळेगावचे संचालिक म्हणून 25 वर्ष जबाबदारी पेलली आहे.

त्यावर विरोधकांचे एकमेव निवडून आलेले संचालक चंद्रराव तावरे यांनी अजित पवारांच्या निवडीवर आक्षेप घेतला.

वेळ संपल्याचं निवडणूक अधिकाऱ्याचं उत्तर

अजित पवारांची नियुक्ती होण्याआधीच चंद्रराव तावरे यांनी अजित पवारांच्या नावावरती हरकत घेतली. ब वर्ग गटातील गटातील व्यक्तीला चेअरमन होता येत नाही असा औरंगाबाद खंडपीठाचा निर्णय आहे असे तावरे यांनी सांगितले. तसेच अजित पवारांची नियुक्ती केल्याने चंद्रराव तावरे यांनी नियमाप्रमाणे कामकाज करावं असं म्हणत बैठकीतून काढता पाय घेतला. यावेळी अजित पवारांची निवड ही बेकायदेशीर असल्याचं रंजन तावरे म्हणाले.

Related Articles

Back to top button