
बारामतीत भारत मुक्ती मोर्चाच्या प्रबोधन संमेलनाला उस्फुर्त प्रतिसाद
सामाजिक समतेचा संदेश
बारामती वार्तापत्र
राष्ट्रमाता,राजमाता अहिल्यामाई होळकर यांच्या त्रिशताब्दी जयंती महोत्सवानिमित्त व बामसेफच्या ३९ व्या राज्य अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर आयोजित करण्यात आलेल्या पुणे जिल्हास्तरीय प्रबोधन संमेलनाला बारामतीत उस्फुर्त प्रतिसाद मिळाला.या कार्यक्रमाचे आयोजन भारत मुक्ती मोर्चा,मौर्य क्रांती संघ,लहुजी क्रांती मोर्चा,छत्रपती क्रांती सेने आणि इतर सहयोगी संघटनांनी संयुक्तपणे केले होते.
या कार्यक्रमामध्ये सामाजिक समतेचा संदेश देणाऱ्या विचारांचे मंथन करून बहुजन समाजाच्या उन्नतीसाठी शिक्षण,संघटन व संघर्ष या त्रिसूत्रीवर भर देण्यात आला.यावेळी प्रमुख वक्त्यांनी महापुरुषांच्या क्रांतिकारी कार्यावर भाष्य करत आजच्या काळातील लढ्याचा मार्ग अधोरेखित केला.बामसेफचे राष्ट्रीय उपाध्यक्ष व्हि.व्हि जाधव यांनी कार्यक्रमाची अध्यक्षता केली असून या प्रसंगी मौर्य क्रांती संघाचे प्रदेशाध्यक्ष प्रा.चंद्रसेन लहाडे,भारत मुक्ती मोर्चाचे प्रदेशाध्यक्ष सचिन बनसोडे,बामसेफचे राष्ट्रीय महासचिव गोरखनाथ वेताळ,राज्य महासचिव आनंद थोरात,माजी उपनगराध्यक्ष भारत अहिवळे,सिद्धार्थ कांबळे,प्रा.अरुण कांबळे,बाळासाहेब राखपसरे,शतायु बगळे,सागर कांबळे,शुभम अहिवळे,अनिकेत मोहिते,सत्यशिला गायकवाड,प्रा.अनिल लोंढे यांच्यासह पुणे,शिरूर,दौंड,इंदापूर येथील कार्यकर्ते आणि पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी बामसेफचे जिल्हाध्यक्ष सुमेध साबळे,भारत मुक्ती मोर्चाचे पुणे जिल्हा उपाध्यक्ष ॲड.सुशिल अहिवळे,विश्वास लोंढे,अमोल सोनवणे,अनिता शेलार,प्रियांका घोडके,राजश्री धेंडे,अमर भोसले,नितीन गव्हाळे,किरण गायकवाड आदींनी परिश्रम घेतले.