
कामगारांच्या मारहाणीत इंदापूर मध्ये चालकाचा मृत्यू
चार जणांवर गुन्हा दाखल
इंदापूर; प्रतिनिधी
गलांडवाडी येथे पोल्ट्री फार्ममधील लंगड्या कोंबड्या न घेतल्याच्या रागातून पोल्ट्री फार्मवरील कामगारांनी केलेल्या मारहाणीत वाहनचालकाचा मृत्यू झाला. रियाज चुन्नुमिया जहागीरदार (वय ५२, रा. सय्यदनगर, नूर मशिदीजवळ, हडपसर) असे मृताचे नाव आहे. याप्रकरणी इंदापूर पोलिस ठाण्यात चार जणांवर गुन्हा दाखल झाला. याबाबत आसिफ युनूस शेख यांनी फिर्याद दिली. कामगार निखिल जाधव, विकी नलावडे, लहू शिंदे (रा. गलांडवाडी नं. १) व विशाल कांबळे (रा. शिरसोडी, ता. इंदापूर) यांनी रियाज यांना मारहाण केली.