इंदापूर

रेडा गावातील महिलेचे घर फोडून संसार उपयोगी साहित्य व घरावरील पत्रा दिवसा चोरीला

भर दिवसा घरफोडी झाल्याने भीतीचे वातावरण

रेडा गावातील महिलेचे घर फोडून संसार उपयोगी साहित्य व घरावरील पत्रा दिवसा चोरीला

भर दिवसा घरफोडी झाल्याने भीतीचे वातावरण

इंदापूर; प्रतिनिधी

रेडा (ता.इंदापूर) या गावातील अलका कृष्णा मोहिते या विवाहित महिलेचे गावात असणारे बंद घर फोडून,घरातील सर्व संसार उपयोगी साहित्य व घरावरील पत्रा तसेच चौकट भर दिवसा चोरीला गेले आहे.यासंदर्भात इंदापूर पोलीस स्टेशन अंतर्गत बावडा
पोलीस दूर शेत्र येथे गुन्हा चार आरोपींवर दाखल करण्यात आला आहे.

या संदर्भात अधिक माहिती अशी की,रेडा गावच्या रहिवासी अलका कृष्णा मोहिते ह्या शेत्र पंढरपूरला (ता.६ जुलै) रोजी गेल्याचा अंदाज बांधून,अलका मोहिते यांचे राहते,घराचे दरवाजे मोडून,घरावरील सर्व पत्रा,लोखंडी अँगल काढून,घरातील ९,६०० किमतीचे साहित्य भर दिवसा चोरून नेले आहे.यामध्ये
लाकडी चौकट,लोखंडी कॉट,ताटे दहा नग व तांबे दहा नग,चार हांडे,तीन बादल्या,दहा ग्लास,तीन पातीले,एक कुकर असे साहित्य चोरून नेले आहे.

फिर्यादी अलका मोहिते यांचा पुतण्या पांडुरंग मोहिते व शेजाऱ्यांनी ही चोरी करताना,आरोपी शेखर मधुकर कांबळे,मनीषा शेखर कांबळे,तसेच शेखर कांबळे यांचा मुलगा व अनोळखी इसम यांना पाहिले आहे.तसेच सदरचे चोरीतील साहित्य चार चाकी वाहनात घेऊन
आरोपी गायब झाले.असे फिर्यादीत नमूद करण्यात आले आहे.

या प्रकरणातील प्रमुख आरोपी शेखर मधुकर कांबळे हा मागील काही वर्षात,एका शिक्षिका महिलेच्या
खून प्रकरणात आरोपी होता.भर दिवसा घरफोडी करून,एका विवाहित महिलेचे गृहपयोगी साहित्य चोरून नेल्यामुळे,रेडा गावात भीतीचे वातावरण पसरले आहे.

इंदापूर पोलिसांनी संबंधित घटनास्थळी भेट देऊन समक्ष पंचनामे केले आहेत.इंदापूर पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक सूर्यकांत कोकणे यांच्या मार्गदर्शनाखाली बावडा पोलीस दूरक्षेत्राचे भारत जाधव व त्यांचे सहकारी
अधिक तपास करीत आहेत.या चोरी प्रकरणातील आरोपींना अद्याप अटक करण्यात आलेली नाही.

____________________________________
इंदापूर तालुक्यातील रेडा येथे
घरफोडी करून संसार उपयोगी साहित्य चोरीला गेलेल्या घटनास्थळाची पाहणी करताना पोलीस.

Related Articles

Back to top button