शैक्षणिक

टी सी महाविद्यालयात CA परीक्षा उत्तीर्ण विद्यार्थ्यांचा गौरव”

पहिल्या बॅचचे दोन विद्यार्थी उत्तीर्ण झाले. 

टी सी महाविद्यालयात CA परीक्षा उत्तीर्ण विद्यार्थ्यांचा गौरव”

पहिल्या बॅचचे दोन विद्यार्थी उत्तीर्ण झाले.
बारामती वार्तापत्र
चार्टर्ड अकाउंटंट(CA) ही परीक्षा भारतातील एक प्रतिष्ठित आणि कठीण समजली जाणारी परीक्षा आहे. या परीक्षेची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांना अधिक चांगले शैक्षणिक मार्गदर्शन मिळण्यासाठी संस्थेने अनेकांत अकॅडमी सी.ए. फाउंडेशन चे वर्ग सुरू केले.
याच वर्गातील पहिल्या बॅचचे दोन विद्यार्थी चि. क्रिश जिंगलानी व चि. कुंदन दोशी प्रथम प्रयत्नात ‘CA Foundation’ ही परीक्षा उत्तीर्ण झाले.
तसेच महाविद्यालयाचे माजी विद्यार्थी दिव्या शहा, अवधूत वायसे, यश गांधी या विद्यार्थ्यांनी सीए अंतिम ही परीक्षा उत्तीर्ण होऊन नेत्रदीपक कामगिरी केली आहे.
CA Intermediate या परीक्षेत महाविद्यालयाचे माजी विद्यार्थी ओम खडके, तन्मय सपकळ, समर्थ काळुखे, मयूर दुधे, संकल्प कदम, समीर पिंजारी, ईश्वरी गांधी या विद्यार्थ्यांनी यश संपादन केले आहे.
महाविद्यालयातर्फे सर्व यशस्वी विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात आला. विद्यार्थ्यांना कनिष्ठ महाविद्यालयातील प्रा. रमेश गोसावी, प्रा.अश्विनी काकडे, प्रा.वैशाली मुरूमकर, प्रा. रश्मी शहा यांनी मार्गदर्शन केले.
विद्यार्थ्यांच्या या यशाबद्दल अनेकांत एज्युकेशन सोसायटीचे अध्यक्ष श्री. जवाहर शाह वाघोलीकर, सचिव श्री. मिलिंद शहा वाघोलीकर, प्राचार्य डॉ. अविनाश जगताप, उपप्राचार्य डॉ.अशोक काळंगे, सौ .वैशाली माळी, रजिस्ट्रार श्री. अभिनंदन शहा, वाणिज्य शाखा समन्वयक श्री.संजय शेंडे, शास्त्र शाखा समन्वयक श्री. गोरखनाथ मोरे यांनी विद्यार्थ्यांचे कौतुक केले.

Related Articles

Back to top button