शैक्षणिक

विद्याप्रतिष्ठानच्या अभियांत्रिकी महाविद्यालयात एआयसीटीई प्रायोजित अटल शिक्षक विकास कार्यशाळा हा कार्यक्रम यशस्वी संपन्न

एकूण ५० प्राध्यापक, संशोधक, उद्योगतज्ज्ञ, विद्यार्थी, आणि तांत्रिक सल्लागार असणाऱ्या प्रतिनिधींनी या कार्यशाळेत सहभाग

विद्याप्रतिष्ठानच्या अभियांत्रिकी महाविद्यालयात एआयसीटीई प्रायोजित अटल शिक्षक विकास कार्यशाळा हा कार्यक्रम यशस्वी संपन्न

एकूण ५० प्राध्यापक, संशोधक, उद्योगतज्ज्ञ, विद्यार्थी, आणि तांत्रिक सल्लागार असणाऱ्या प्रतिनिधींनी या कार्यशाळेत सहभाग

बारामती वार्तापत्र 

विद्याप्रतिष्ठानच्या कमलनयन बजाज इन्स्टिट्यूट ऑफ इंजिनीअरिंग अँड टेक्नॉलॉजी, बारामती येथे एआयसीटीई प्रशिक्षण आणि शिक्षण अकादमी (अटल) प्रायोजित एक आठवड्याचा “शैक्षणिक क्षेत्र व उद्योग यामधील दुवा: डिजिटल मॅन्युफॅक्चरिंग व ऑटोमेशनमधील भविष्यकालीन कौशल्ये” या विषयावर आधारित शिक्षक विकास कार्यशाळा हा कार्यक्रम दिनांक २३ जून ते २८ जून २०२५ दरम्यान यशस्वीरित्या पार पडला.

या कार्यक्रमाचे उद्घाटन महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. सुधीर लांडे यांच्या शुभहस्ते व मान्यवरांच्या उपस्थितीत संपन्न झाले.

या कार्यशाळेत महाराष्ट्रातील नामांकित असणाऱ्या एम आयटी पुणे, एफसी रॉडड्रीक्स मुंबई, पीआयसीटी, पुणे तसेच मॉडर्न कॉलेज पुणे अशा एकूण ५० प्राध्यापक, संशोधक, उद्योगतज्ज्ञ, विद्यार्थी, आणि तांत्रिक सल्लागार असणाऱ्या प्रतिनिधींनी या कार्यशाळेत सहभाग घेतला.

या कार्यशाळेचे आयोजन महाविद्यालयातील यांत्रिकी अभियांत्रिकी विभागामार्फत करण्यात आले होते. या कार्यशाळेत डिजिटल मॅन्युफॅक्चरिंग, स्मार्ट ऑटोमेशन, इंडस्ट्री ४.० तंत्रज्ञान, आर्टिफिशियल इंटेलिजन्स, इंडस्ट्रियल इंटरनेट ऑफ थिंग्ज, सायबर-फिजिकल सिस्टीम्स, रोबोटिक्स अशा आधुनिक तंत्रज्ञानावर आधारित सत्रे पार पडली.

या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा. विशाल भागवत व प्रा. श्रीकांत महाडिक यांनी केले.
या कार्यक्रमासाठी प्रमुख तज्ज्ञ मार्गदर्शक म्हणून डॉ. ए. डी. पतंगे, एबीबी ग्लोबल इंडस्ट्रीज प्रा. लि., बेंगळुरू डॉ. अनुश मिश्रा, एबीबी ग्लोबल इंडस्ट्रीज प्रा. लि., बेंगळुरू, श्री. गौरव मापारी, पॅटर्न टेक्नॉलॉजी पुणे, डॉ. बुभाती मुरुगनाथम, हनीवेल लि., पुणे, डॉ. एन. के. चौगुले, सीओईपी तंत्रज्ञान विद्यापीठ, पुणे, डॉ. ए. व्ही. मुळे, सीओईपी तंत्रज्ञान विद्यापीठ, पुणे, डॉ. एम. डी. जयभाये, सीओईपी तंत्रज्ञान विद्यापीठ, पुणे आदी मान्यवरांनी या कार्यक्रमाला मार्गदर्शन केले व उपस्थिती दाखवली.

या कार्यशाळेचे आयोजन महाविद्यालयातील यांत्रिकी अभियांत्रिकी विभाग तसेच या कार्यक्रमाचे समन्वयक डॉ. एस. एम. भोसलें (डीन अकॅडमिक्स व प्रा., यांत्रिकी विभाग) व डॉ. सी. बी. नायक (सहाय्यक प्राध्यापक) यांनी यशस्वी आयोजन केले.

या कार्यक्रमातून सहभागी प्राध्यापक व संशोधकांना उद्योग आणि शिक्षण क्षेत्रातील दरी मिटवून, आधुनिक औद्योगिक तंत्रज्ञानांचा वापर शिक्षण व संशोधन प्रक्रियेत कसा करता येईल याचे सखोल मार्गदर्शन मिळाले. कार्यक्रमाचा मुख्य उद्देश प्राध्यापकांना नव्या युगातील कौशल्यांनी सुसज्ज करणे, उद्योग क्षेत्राच्या गरजेनुसार संशोधनाची दिशा ठरविणे आणि विद्यार्थ्यांसाठी भविष्यातील रोजगार क्षमतांमध्ये वाढ करणे हा होता.

हा कार्यक्रम यशस्वी होण्याकरता विभाग प्रमुख डॉ. मनीषा लांडे, यांत्रिकी विभागाचे सर्व प्राध्यापक तसेच शिक्षकेतर कर्मचारी वर्ग या सर्वांचे मोलाचे सहकार्य लाभले.

Related Articles

Back to top button